• Download App
    मायावती म्हणाल्या मी धडधाकट, पक्षाला कोणत्याही उत्तराधिकाऱ्याची आवश्यकता नाही|Mayawati said, "I am strong. The party does not need any successor."

    मायावती म्हणाल्या मी धडधाकट, पक्षाला कोणत्याही उत्तराधिकाऱ्याची आवश्यकता नाही

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर आल्या असताना बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांची तब्येत खराब झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण याचीही चर्चा सुरू झाली होती. मात्र, पत्रकार परिषद घेत मायावती यांनीच स्वत: आपण धडधाकड आहो आणि सध्यातरी पक्षाला कोणत्याही उत्तराधिकाऱ्याची आवश्यकता नाही.Mayawati said, “I am strong. The party does not need any successor.”

    भविष्यात पक्षासाठी कठोर मेहनत करणारा दलित नेताच आपल्या पक्षाचा उत्तराधिकारी असेल, असे सांगताना मायावती म्हणाल्या, माझी प्रकृती उत्तम आहे. मला सध्या कुणालाही आपला उत्तराधिकारी बनविण्याची आवश्यकता नाही. परंतु, जेव्हा माझं आरोग्य ढासळेल तेव्हा मात्र उत्तराधिकाऱ्याबद्दल मी नक्कीच विचार करेल.



    सध्या तरी मी फीट आहे, अनफिट होण्यासाठी मला आणखी काही वर्ष लागतील. गेल्या दोन वर्षांपासून करोना संक्रमण सुरू आहे. परंतु, सुदैवानं मला अद्याप करोनासारख्या आजाराला सामोरं जावं लागलेले नाही.

    मी जेव्हा आपला उत्तराधिकारी घोषित करेल तेव्हा तो अनुसूचित जाती-जमातीमधून असेल, ज्याने प्रत्येक कठीण प्रसंगात माझ्याप्रती आणि पक्षाप्रती पूर्ण इमाने-इतबारे आणि तन-मन-धनानं सहकार्य केले असेल. पक्षाला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. परंतु, अनुसूचित जाती जमातीतील लोक आपल्या निश्चियापासून परावृत्त झाले नाहीत असे मायावती यांनी म्हटले आहे.

    Mayawati said, “I am strong. The party does not need any successor.”

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य