• Download App
    NDA आणि I.N.D.I.A आघाड्यांपासून मायावती लांबच; पण दुष्परिणाम मात्र I.N.D.I.A वरच!! Mayawati is far from NDA and I.N.D.I.A alliances

    NDA आणि I.N.D.I.A आघाड्यांपासून मायावती लांबच; पण दुष्परिणाम मात्र I.N.D.I.A वरच!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मुंबईत उद्या 31 ऑगस्ट ने परवा 1 सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये होणाऱ्या “इंडिया” आणि “एनडीए” आघाडीच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी दोन्ही आघाड्यांपासून स्वतःला लांबच ठेवले आहे. दोन्ही आघाड्या गरीब विरोधी, जातीयवादी, सांप्रदायिक, श्रीमंत वर्गाच्या समर्थक आणि भांडवलदार निष्ठ आहेत, असे टीकास्त्र मायावती यांनी सोडले आहे. Mayawati is far from NDA and I.N.D.I.A alliances

    मायावती यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करून दोन्ही आघाड्यांचे वाभाडे काढले आहेत. त्याच वेळी त्यांनी बहुजन समाज पार्टी वर भाजपाई असण्याचा आरोप करणाऱ्या “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांवर जोरदार शरसंधान साधले आहे. “इंडिया” आघाडीतले सगळे पक्ष जातीयवादी, सांप्रदायिक श्रीमंतांचे समर्थक तर आहेतच, पण त्यांच्याबरोबर कोणी गेले नाही की ते इतरांना भाजपाई म्हणून हिणवतात हा त्यांचा दांभिकपणा आहे, अशा शब्दांत प्रहार केला आहे.

    “इंडिया” आणि “एनडीए” आघाडीच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मायावतीने बहुजन समाज पार्टीला या दोन्ही आघाड्यांपासून दूर राखत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जाहीर करून टाकले आहे. पण याचा राजकीय तोटा प्रामुख्याने उत्तर प्रदेशात “इंडिया” आघाडीतल्याच घटक पक्षांना झाल्याचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीतला अनुभव आहे.

    2019 मध्ये मायावतींनी त्यावेळच्या “एनडीए” आणि “युपीए” आघाडी पासून स्वतंत्र रहात निवडणुका लढवल्या होत्या. उत्तर प्रदेश मध्ये त्यांच्या बहुजन समाज पार्टीला तब्बल 10 जागांवर विजय मिळवला मिळाला होता. अखिलेश यादवांच्या समाजवादी पार्टीला देखील त्यांनी मागे सारले होते. काँग्रेस तर त्यांच्या खिजगणतीतही नव्हती. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपला 62, बहुजन समाज पार्टीला 10, समाजवादी पार्टीला 5 आणि काँग्रेसला 2 जागा मिळाल्या होत्या.

    याचा अर्थ भाजपशी टक्कर घेताना मायावती जरी पिछाडीवर होत्या, तरी बाकीच्या पक्षांच्या तुलनेत त्या कितीतरी आघाडीवर होत्या. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मायावतींची साथ “इंडिया” आघाडीला मिळावी यासाठी इंडिया आघाडीतले काही नेते बॅकडोअर डिप्लोमसी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मायावतीने उघडपणे “इंडिया” आघाडीतल्या नेत्यांवर शरसंधान साधल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

    2024 च्या लोकसभा निवडणुकीत मायावतींनी आपला आपली स्वतंत्र भूमिका कायम ठेवली, तर त्याचा फटका “इंडिया” आघाडीतल्या पक्षांना बसण्याची भीती या नेत्यांना वाटत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी त्याची साक्ष देते.

    Mayawati is far from NDA and I.N.D.I.A alliances

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक