• Download App
    मातृदेवतेला अंतिम निरोप देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्येयपथावर!; बंगाल मध्ये वंदे भारत सह विविध प्रकल्पाचे उद्घाटन May god give you the strength to continue your work, please take some rest

    मातृदेवतेला अंतिम निरोप देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्येयपथावर!; बंगाल मध्ये वंदे भारत सह विविध प्रकल्पाचे उद्घाटन

    वृत्तसंस्था

    कोलकाता : मातोश्री हिराबा यांना अंतिम निरोप देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी लगेच ध्येयपथावर परतले आहेत. अहमदाबादमध्ये सकाळी 9.40 वाजता त्यांनी आईच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. यानंतर अहमदाबादमधूनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगालमध्ये आयोजित कार्यक्रमात ते सामील झाले. हावडा – न्यू जलपाईगुडी वंदे भारत ट्रेनला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला May god give you the strength to continue your work, please take some rest

    ममतांनी केले सांत्वन

    कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना म्हटले की, माननीय पंतप्रधान, आज तुमच्यासाठी दुःखाचा दिवस आहे. आपली आई ती आमचीची आईच आहे.
    तुमचे मोठे नुकसान झाले आहे. देव तुम्हाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. आपण आता थोडी विश्रांती घ्या. आपण येथे येणार होता, पण आईच्या निधनामुळे येऊ शकला नाहीत, तरीही तुम्ही या कार्यक्रमात व्हर्च्युअल पद्धतीने सामील झालात, यासाठी मी आपली आभारी आहे.

    पंतप्रधान मोदींनी आज बंगालमध्ये 7,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. यामध्ये कोलकाता मेट्रोच्या पर्पल लाईनच्या जोका-तरातला टप्प्याचे उद्घाटन आणि राज्यातील चार रेल्वे प्रकल्पांचा समावेश आहे.

    नवीन जलपाईगुडी स्टेशनचा पुनर्विकास केला जाणार आहे. रेल्वे तिकीट विक्रीच्या बाबतीत हे स्थानक देशातील टॉप 100 रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. दररोज 36,000 लोक स्टेशनचा वापर करतात.

    बैठकीला 5 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार

    नमामि गंगे प्रकल्पांतर्गत गंगा वाहना वाहत असलेल्या सर्व राज्यांना जोडून घेण्याचा महत्त्वकांक्षी प्रकल्प केंद्राने आखला आहे. या बैठकीचे आयोजन कोलकत्यात केले आहे. तिला पंतप्रधान प्रत्यक्ष हजर राहणार होते. पण आता ते व्हर्चुअली उपस्थित राहणार आहेत.

    या बैठकीला केंद्रीय जलशक्ती मंत्री, परिषदेचे सदस्य असलेले इतर केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि त्यांच्या पुनरुज्जीवनावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रीय गंगा परिषदेला देण्यात आली आहे.

    अनेक प्रकल्पांचे उद्घाटन

    राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन अंतर्गत 990 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 7 सीव्हरेज पायाभूत सुविधा प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करतील. या प्रकल्पांमुळे पश्चिम बंगालमध्ये 200 MLD पेक्षा जास्त सांडपाणी प्रक्रिया क्षमता वाढेल.

    नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) अंतर्गत 1585 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या 5 सीव्हरेज प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. जोका, डायमंड हार्बर रोड, कोलकाता येथे सुमारे 100 कोटी रुपये खर्चून विकसित केलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर अँड सॅनिटेशन (DSPM – NIWAS) चे उद्घाटन होणार आहे.

    May god give you the strength to continue your work, please take some rest

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती