काश्मीर फाइल्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील मौलानांनी एका शाळेत पत्रकार परिषद घेतली. या चित्रपटामुळे द्वेष भावना वाढून दंगली होतील असे ते म्हणाले.विशेष म्हणजे पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकारांनी चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यावर मौलाना संतापले. त्यांनी पत्रकाराशी झटापट केली.
विशेष प्रतिनिधी
सहारणपूर -काश्मीर फाइल्सवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील मौलानांनी एका शाळेत पत्रकार परिषद घेतली. या चित्रपटामुळे द्वेष भावना वाढून दंगली होतील असे ते म्हणाले.विशेष म्हणजे पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकारांनी चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यावर मौलाना संतापले. त्यांनी पत्रकाराशी झटापट केली.Maulana’s press conference in Saharanpur to demand ban on Kashmir files
मुत्ताहिदा मजलिस-ए-अमल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संघटनेनं ही पत्रकार परिषद घेतली. जाते. सहारनपूर जिल्ह्यातील मुस्लिम, मदरसे, शाळा, महाविद्यालये आणि इतर संघटनांच्या धार्मिक आणि सामाजिक संघटनांचा हा एकत्रित गट आहे.
मुत्ताहिदा मजलिस-ए-अमलचे प्रवक्ते शेर शाह आलम म्हणाले की, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून एका षड्यंत्राखाली जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परस्पर बंधुभाव संपवण्याचे प्रयत्न होत आहेत हे दुर्दैवी आहे. ही पत्रकार परिषद द काश्मीर फाइल्स या चित्रपटाबाबत आयोजित करण्यात आली आहे.
चित्रपट देशात द्वेष निर्माण करत आहे. या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी. वास्तव बाहेर आले पाहिजे, असे येथील सरकार म्हणते, मग येथे अनेक वास्तव आहेत. जुन्या विसरलेल्या आठवणी नव्याने उचलून, रचलेल्या किस्से बनवून, लोकांच्या मध्ये सोडून देऊन काय उपयोग? लोक एकमेकांचा द्वेष करतील आणि जेव्हा द्वेष असेल तेव्हा दंगली होतील, मॉब लिंचिंग होईल.
चित्रपटात सर्व ऐतिहासिक तथ्ये मोडीत काढण्यात आली आहेत. काही लोकांना विशिष्ट दृष्टिकोन लादायचा आहे. शांतता आणि सौहार्द राखण्याचा हा मार्ग नाही. देशातील लोकांची दिशाभूल होऊ नये आणि एकमेकांचा द्वेष करू नये अशी आमची इच्छा आहे. त्यापेक्षा हजारो वर्षे जुनी ‘तहजीब’ स्वीकारा जी परस्पर बंधुत्वाचे प्रतीक आहे.
Maulana’s press conference in Saharanpur to demand ban on Kashmir files
महत्त्वाच्या बातम्या
- वीज कर्मचाऱ्यांचा संप स्थगित; ऊर्जा मंत्र्यांसमवेत सकारात्मक बैठक!!
- Modi – Memon – Pawar : माजिद मेमन यांची मोदींवर स्तुतिसुमने; पण पवारांचे प्रश्न टाळून निघून जाणे!!
- कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील -येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार
- अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मान्यता