• Download App
    Maulana Mahmud Madani संघाने ज्यांच्याशी संवाद साधला, त्या मौलानाने पत्रकारालाच मुसलमान बनायला सांगितले!!; याचा नेमका अर्थ काय??

    संघाने ज्यांच्याशी संवाद साधला, त्या मौलानाने पत्रकारालाच मुसलमान बनायला सांगितले!!; याचा नेमका अर्थ काय??

    नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या Muslim outreach मध्ये ज्यांनी भाग घेतला, संघाने ज्यांच्याशी संवाद साधला, त्या मौलानानेच मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला मुसलमान बनायला सांगितले.

    जमीयत उलेमा ए हिंद संघटनेचे प्रमुख मौलाना मेहमूद मदनी यांच्या बाबतीत हा किस्सा घडला. भोपाळ मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात मौलाना मेहमूद मदनी यांनी मुस्लिम समाजाला जिहाद करायला सांगितले. जिथे जिथे अन्याय होईल, तिथे जिहाद होईलच, अशी दमबाजीची भाषा त्यांनी वापरली. सुप्रीम कोर्टाच्या विरोधात शेरेबाजी केली. राम मंदिर आणि ट्रिपल तलाक संदर्भात सुप्रीम कोर्टाने चुकीचे निर्णय दिले, असा आरोप केला.

    मौलाना मेहमूद मदनी यांच्या भाषणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली. मौलाना मेहमूद मदनी यांनी मुस्लिम समाजाला जिहाद करण्यासाठी चिथावणी दिली, असा आरोप सगळीकडून त्यांच्यावर झाला. यासंदर्भात खुलासा घेण्यासाठी Ani वृत्तसंसथेचे पत्रकार नवीन कपूर यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी बोलताना मौलाना मेहमूद मदनी यांनी मुसलमानांची चिंता, त्यांची समस्या अथवा त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांची मते समजण्यासाठी तुम्हाला मुसलमान व्हावे लागेल, असे अजब उत्तर दिले. त्याचवेळी मौलाना मेहमूद मदनी यांनी देशांमध्ये मुसलमान खुलेपणाने आपले म्हणणे मांडू शकेल, असे वातावरण नाही, अशी टिप्पणी सुद्धा केली.

    संघाशी संवाद

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही महिन्यांपूर्वी राजधानी नवी दिल्लीतच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याबरोबर काही मुस्लिम विद्वानांचा आणि संघटनांच्या प्रमुखांचा संवाद ठेवला होता. या संवादामध्ये मौलाना मेहमूद मदनी यांना सुद्धा निमंत्रित केले होते. ते त्या संवादात सहभागी झाले होते. अनेक विषयांवर संघाशी मतभेद असले, तरी संवादाने ते मतभेद मिटू शकतात. काही मुद्द्यांवर मार्ग निघू शकतो, असे मत मदनी यांनी त्यानंतर व्यक्त केले होते.

    भोपाळ मध्ये चिथावणीखोर भाषण

    परंतु, याच मौलाना मेहमूद मदनी यांनी भोपाळ मधल्या कार्यक्रमात पूर्णपणे वेगळा सूर लावत मुस्लिम तरुणांना जिहाद करायची चिथावणी दिली होती. सध्याच्या वातावरणात मुस्लिम समाजाला अक्षरशः भिंतीकडे ढकलले गेले आहे. मुस्लिम समाज खुलेपणाने आपले मत मांडू शकत नाही. पण जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे जिहाद होईल, अशी भाषा त्यांनी वापरली होती.



    मुसलमान व्हावे लागेल

    त्यांच्या या भाषणासंदर्भात खुलासा घेण्यासाठी Ani वृत्तसंस्थेचे वरिष्ठ पत्रकार नवीन कपूर त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी मुसलमानांची चिंता आणि त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील, तर तुम्हाला मुसलमान व्हावे लागेल, असे वक्तव्य केले. त्यावर नवीन कपूर यांनी या वक्तव्याशी आपले मतभेद असल्याचे स्पष्ट केले. तुम्हाला मतभेद व्यक्त करायचा अधिकार आहे, पण मला माझे मत मांडायचा सुद्धा अधिकार आहे, असे मौलाना मेहमूद मदनी त्यावेळी म्हणाले. भोपाळ मधल्या भाषणाचे सुद्धा त्यांनी समर्थन केले. जिहाद आणि हिंसाचार जिहाद आणि दहशतवाद यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असा दावा सुद्धा मौलाना मेहमूद मदनी यांनी केला. त्याचवेळी त्यांनी देशातले वातावरण एवढे मोकळे नाही, की मुसलमान आपली चिंता अथवा समस्या उघडपणे मांडू शकेल, असाही दावा केला.

    मत नाही बदलले

    संघाशी संवाद झाल्यानंतर सुद्धा मौलाना मेहमूद मदनी यांचे जिहाद विषयाचे मत बदलले नाही. म्हणूनच त्यांनी भोपाळ मध्ये चिथावणीखोर भाषण केले. त्यावरून देशभरात वादळ उठल्यानंतर सुद्धा Ani वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्या भाषणाचे समर्थन केले.

    Maulana Mahmud Madani asked journalist to convert to Islam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supreme Court : दिल्ली-NCR प्रदूषण, सुप्रीम कोर्टाने म्हटले- फक्त शेतकरी जबाबदार नाहीत, कोविडमध्येही शेतातील कचरा जाळला तरीही आकाश स्वच्छ होते

    BLO Protests : बंगालमध्ये SIRच्या विरोधात BLOचे आंदोलन; यूपीमध्ये सहाय्यक बीएलओचा झोपेतच मृत्यू

    वंदेमातरम वरच्या चर्चेवर राहुल गांधींचे No comments; पण पत्रकारांशी कुत्र्याच्या मुद्द्यावर चर्चा!!