वृत्तसंस्था
गुवाहाटी : आसाम मधील राजकीय पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख मौलाना बद्रुद्दीन अजमल यांची जीभ घसरली आहे. त्यांनी हिंदूंना सल्ला देताना वाट्टेल तसे बेछूट उद्गार काढले आहेत. लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी अजब मत व्यक्त केले आहे. Maulana Badruddin Ajmal’s bad words; Hindus keep 2 – 3 wives till 40 years
मौलाना बद्रुद्दीन अजमल म्हणाले, की हिंदू लोक 40 व्या वर्षापर्यंत बेकायदेशीररित्या 2 – 3 बायका ठेवतात. त्यांच्यापासून मुले होऊ देत नाहीत. मग 40 व्या वर्षानंतर लग्न करतात पण त्यावेळी त्यांच्यात मुले पैदा करण्याची क्षमता उरत नाही. वास्तविक सरकारने मुलींसाठी 18 व्या वर्षी आणि मुलांसाठी 21 व्या वर्षी लग्न करण्याची मुभा दिली आहे.
हिंदू त्या वयांमध्ये मुलामुलींची लग्न करत नाहीत. मुसलमान मात्र योग्य वयात मुला मुलींची लग्न करतात. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त मुले पैदा होतात. हिंदू 40 व्या वर्षापर्यंत मुले पैदा करत नाहीत. त्याऐवजी दोन-तीन बायका ठेवतात. हिंदूंनी पण मुसलमानांना फॉलो करून आपोआप आपल्या मुलांची अठराव्या 18 ते 21 वयोगटात लग्न करावी चांगल्या जमिनीत बीज पेरले की धान्य चांगले उगवते. मुसलमानांना फॉलो करून हिंदू योग्य वेळेत लग्न केले तर त्यांच्याकडे भरपूर मुले पैदा होतील, असे उद्गार मौलाना बद्रुद्दीन अजमल यांनी काढले आहेत त्यांचा व्हिडिओ जाहीर केला आहे.
असे आहेत मौलाना बद्रुद्दीन अजमल
हेच ते मौलाना बद्रुद्दीन अजमल आहेत, जे आसाम मधून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाशी काँग्रेसने आघाडी करून आसाम मधली निवडणूक लढवली होती. परंतु, काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आसाम विधानसभा निवडणुकीत राज्यात टोपी आणि लुंगीचे राज्य येणार आहे असा प्रचार केला होता.
Maulana Badruddin Ajmal’s bad words; Hindus keep 2 – 3 wives till 40 years
महत्वाच्या बातम्या