• Download App
    समाजवादी कनेक्शन बाहेर येताच अहमदाबाद बाँबस्फोटातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधात मौलाना अर्षद मदनी हायकोर्टात!! । Maulana Arshad Madani in the High Court against the death sentence of the accused in the Ahmedabad bomb blast as soon as the socialist connection came out !!

    समाजवादी कनेक्शन बाहेर येताच अहमदाबाद बाँबस्फोटातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधात मौलाना अर्षद मदनी हायकोर्टात!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : अहमदाबाद बाँबस्फोटात 38 आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे, तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात उत्तर प्रदेशातील जमियात उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्षद मदनी यांनी हायकोर्टात दाद मागण्याची घोषणा केली आहे. Maulana Arshad Madani in the High Court against the death sentence of the accused in the Ahmedabad bomb blast as soon as the socialist connection came out !!

    आमदाबाद बॉम्बस्फोटातील 38 आरोपींना फाशी देण्याची गरज नाही. त्यांची शिक्षा कमी केली जाऊ शकते. जर हायकोर्टाने शिक्षा तर मी केले नाही तर जमियात उलमा ए हिंद सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावेल, असे मौलाना अर्षद मदनी यांनी जाहीर केले आहे.

    अहमदाबाद बॉम्बस्फोटातील आरोपींचे कनेक्शन उत्तर प्रदेशातील आझमगड, मेरठ आणि बिजनौरचे आढळले आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद सैफ हा समाजवादी पक्षाचे नेते मास्टर यांचा मुलगा आहे. त्याचबरोबर बिजनौरच्या तनवीर मोहम्मदला फाशीची शिक्षा झाली आहे, तसेच मेरठमधल्या तनवीर मोहम्मदलाही फाशीची शिक्षा झाली आहे. त्यामुळे मौलाना अर्षद मदनी यांनी ही शिक्षा कमी करण्यासाठी हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    मौलाना अर्षद मदनी यांचे आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी देखील मैत्री संबंध आहेत. जमियात उलेमा ए हिंदने आयोजित केलेल्या ईद मिलनच्या कार्यक्रमात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल हे एकत्रितपणे सामील झाले होते.

    Maulana Arshad Madani in the High Court against the death sentence of the accused in the Ahmedabad bomb blast as soon as the socialist connection came out !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक