वृत्तसंस्था
मुंबई : सध्याचा उपविजेता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री 2023 च्या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. हेन्रीच्या जागी काइल जेमिसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली. Matt Henry out of World Cup; Hand injury in match against South Africa
बोर्डाने ट्विट केले की, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने या बदलाला मान्यता दिली आहे. शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी जेमिसन गुरुवारी रात्री उशिरा बेंगळुरूला पोहोचला.
1 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलंदाजी करताना हेन्रीला दुखापत झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 27व्या षटकातील तिसऱ्या चेंडूनंतर या वेगवान गोलंदाजाच्या अंगठ्यात ताण आला. यानंतर तो मैदानाबाहेर गेला. 27 वे षटक जिमी नीशमने पूर्ण केले.
न्यूझीलंड संघाचा चौथा खेळाडू जखमी
केन विल्यमसन, लॉकी फर्ग्युसन आणि मार्क चॅपमन हेही दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन 13 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता. त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. दुखापतीमुळे तो शेवटचे चार सामनेही खेळू शकला नाही. त्याच्या जागी टॉम लॅथम कर्णधार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्याने नेटवर फलंदाजीचा सराव सुरू केला आहे, ही दिलासादायक बाब आहे.
world cup 2023 : लंकेचे पुरते पत्ते पिसले, 55 धावांत डाव कोसळला; टीम भारत सेमी फायनल मध्ये!!
न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे
न्यूझीलंड संघाने वर्ल्डकपमध्ये शानदार सुरुवात केली होती. संघाने पहिले चार सामने सलग जिंकले. पण, गेल्या तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. चार विजय आणि तीन पराभवांसह सात सामन्यांतून 8 गुणांसह संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचे साखळी फेरीत अजून दोन सामने बाकी आहेत. त्यांना 4 नोव्हेंबरला पाकिस्तान आणि 9 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे.
Matt Henry out of World Cup; Hand injury in match against South Africa
महत्वाच्या बातम्या
- जातनिहाय जनगणना, जात आरक्षण राजकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी व्होट बँक बांधणीचा भाजपचा मास्टर प्लॅन
- नेपाळमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप, 128 जणांचा मृत्यू; दिल्ली-एनसीआर, एमपी-यूपीतही हादरली धरणी
- Maratha Reservation : ”सरकार म्हणून कुठलाही निर्णय घाई गडबडीत घेऊ शकत नाही”, मुख्यमंत्री शिंदेंची स्पष्ट भूमिका!