वृत्तसंस्था
मथुरा : मथुरेतील फटाका मार्केटला दिवाळीच्या दिवशी भीषण आग लागली. या अपघातात 15 जण भाजले. यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यासह 2 दुचाकी आणि 12 दुकाने जळून खाक झाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यात व्यस्त आहेत. राया कोतवाली परिसरातील गोपाल बाग येथे हा अपघात झाला.Mathura’s Firecracker Market Fires On Diwali; 15 burned, 4 in critical condition; 12 bikes burnt
रविवारी येथील फटाका मार्केटमध्ये फटाक्यांची 20 दुकाने थाटण्यात आली होती. दुपारी दोन वाजता शहरासह परिसरातील गावातील नागरिक मोठ्या संख्येने फटाके खरेदीसाठी आले होते. बाजारात खरेदी सुरू होती, त्याच दरम्यान अचानक एका दुकानाला आग लागली. आग लागल्याचे समजताच काही लोकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अयशस्वी ठरले.
यानंतर फटाके फुटू लागले. हे फटाके इकडे-तिकडे इतर दुकानांमध्ये पडले, त्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत मोठी आग लागली. दुकानांना आग लागल्याने लोक घाबरले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. आगीत अनेक जण होरपळून निघाले. सर्वत्र धूर दिसत होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
मथुराचे जिल्हा दंडाधिकारी शैलेंद्र सिंह म्हणाले, “आगीचे कारण शोधले जात आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे. जखमींच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. सुमारे 9 जण जखमी झाले आहेत. या घटनेची चौकशी समिती स्थापन करण्यात येत आहे.
Mathura’s Firecracker Market Fires On Diwali; 15 burned, 4 in critical condition; 12 bikes burnt
महत्वाच्या बातम्या
- Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि IDBI बँक यांच्यात सामंजस्य करार!
- ज्येष्ठ नागरिकांच्या दिवाळी आनंदात भर; नवी मुंबईत मोफत बस प्रवास!!
- पुढील आठवड्यात उत्तराखंडमध्ये UCC लागू होणार?, विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी सुरू
- मथुरा पोलिसांनी ५० हजार रुपयांचा इनाम असलेल्या आरोपीला केले ठार