• Download App
    मथुरा श्री कृष्ण जन्मभूमि : शाही ईदगाह परिसर सील करण्यासाठी कोर्टात याचिका; हिंदू अवशेष उखडून टाकण्याची भीती!!Mathura Shri Krishna Janmabhoomi: Petition in court to seal the royal Eidgah premises; Fear of uprooting Hindu relics

    मथुरा श्री कृष्ण जन्मभूमि : शाही ईदगाह परिसर सील करण्यासाठी कोर्टात याचिका; हिंदू अवशेष उखडून टाकण्याची भीती!!

    वृत्तसंस्था

    मथुरा : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीत हिंदू धार्मिक अवशेष आढळले. इतकेच नव्हे तर तिथल्या वजूखान्यात म्हणजे तलावात शिवलिंग आढळले. या पार्श्वभूमीवर हिंदू पक्षाने मथुरेतील श्री कृष्ण जन्मभूमि शाही ईदगाह वादात एक महत्त्वाची याचिका दाखल केली आहे. Mathura Shri Krishna Janmabhoomi: Petition in court to seal the royal Eidgah premises; Fear of uprooting Hindu relics

    शाही ईदगाह आणि परिसराला ताबडतोब सील करण्यात यावे. कारण शाही ईदगाहाच्या मधल्या घुमटाखाली श्री कृष्ण जन्मभूमि चे अवशेष अजूनही उपलब्ध आहेत. ते उखडून टाकण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे त्या परिसराचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्या परिसराची व्हिडीओग्राफी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा आशयाची याचिका मथुरेच्या जिल्हा न्यायालयात हिंदू पक्षाच्या वकिलांनी केली आहे.



    मथुरा वादासंदर्भात अलाहाबाद हायकोर्टात 19 मे रोजी सुनावणी होणार आहे. त्या आधी जिल्हा कोर्ट आणि अन्य न्यायालयांनी आपल्या सर्व याचिकांचे निर्णय लवकर देऊन टाकावेत. मालकी हक्काचे विषय मिटवून टाकावेत, असे आदेश हायकोर्टाने कनिष्ठ न्यायालयांना दिले आहेत.

    अलाहाबाद हायकोर्टात सुनावणी होण्याआधी मथुरा जिल्हा न्यायालयाने ईदगाह मशिद आणि परिसर सील करावा. तेथील अवशेषांचे संरक्षण करावे. तसे आदेश जिल्हा प्रशासनाला द्यावेत. मथुरा येथील ईदगाह परिसरासाठी देखील कोर्ट कमिशनर नेमून व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करावे, असे आदेश अशी मागणी या याचिकेत हिंदू पक्षाच्या वकिलांनी केली आहे.
    या याचिकेवर मथुरा जिल्हा न्यायालय नेमका काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    – टिपू सुलतानची मशीद की हनुमान मंदिर??

    दक्षिणेत देखील अशा प्रकारचा वाद पोहोचला असून मंड्या जिल्ह्यातील टिपू सुलतानने बांधलेल्या मशिदीत देखील हिंदू मंदिराचे अवशेष आहेत, असा दावा हिंदू पक्षाने केला आहे. तेथे हनुमान मंदिर होते. ते पाडून टिपू सुलतान मशिद बांधल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे.

    Mathura Shri Krishna Janmabhoomi: Petition in court to seal the royal Eidgah premises; Fear of uprooting Hindu relics

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त