• Download App
    निजामाबाद दहशतवादी कट प्रकरणी ‘NIA’ कडून ‘PFI’च्या मास्टर वेपन ट्रेनरला अटक! Master Weapon Trainer of PFI arrested by NIA in Nizamabad terror conspiracy case

    निजामाबाद दहशतवादी कट प्रकरणी ‘NIA’ कडून ‘PFI’च्या मास्टर वेपन ट्रेनरला अटक!

    (संग्रहित)

    कर्नाटकात ठोकल्या बेड्या;  खोटी ओळ निर्माण करून प्लंबरचा व्यवसाय करत होता.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) निजामाबाद दहशतवादी कट प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या मास्टर वेपन ट्रेनरला कर्नाटकमध्ये अटक केली आहे. एजन्सीने बुधवारी ही माहिती दिली. Master Weapon Trainer of PFI arrested by NIA in Nizamabad terror conspiracy case

    नौसम मोहम्मद युनूस उर्फ ​​युनूस असे ३३ वर्षीय आरोपीचे नाव असून तो नंदयाल येथील रहिवासी असून त्याच्या मोठ्या भावाचा इन्व्हर्टरचा व्यवसाय चालवत होता. त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.

    हे प्रकरण आता बंदी घातलेल्या PFI संघटनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तरुणांची भरती आणि कट्टरपंथी बनवण्यासाठी रचलेल्या गुन्हेगारी षडयंत्राशी संबंधित आहे. जे  भारतात इस्लामिक शासन स्थापन करण्याच्या अंतिम उद्देशाने दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना सशस्त्र बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये युनूसच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा तो पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांसह फरार असल्याचे आढळून आले.

    युनूसने आपले संपूर्ण कुटुंब आंध्र प्रदेशातून हलवले होते आणि कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील कौल बाजार भागात लपून बसल्याचे एनआयएच्या तपासात उघड झाले आहे, जिथे त्याने बशीर नावाची नवीन ओळख आणि प्लंबर म्हणून नवीन व्यवसाय स्वीकारला होता.

    Master Weapon Trainer of PFI arrested by NIA in Nizamabad terror conspiracy case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट