• Download App
    राज्यसभेत प्रचंड गदारोळ, महिला खासदारांसोबत झाले गैरवर्तन, ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आरोप Massive riots in Rajya Sabha, abuse of women MPs allegations of Sharad Pawar

    राज्यसभेत प्रचंड गदारोळ, महिला खासदारांसोबत झाले गैरवर्तन, ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आरोप

    साधारण विमा व्यवसाय दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवायचे, अशी मागणी करत गोंधळ घातला .परंतु गोंधळात सरकारने हे विधेयक मंजूर केले. Massive riots in Rajya Sabha, abuse of women MPs allegations of Sharad Pawar


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राज्यसभेत पेगासस हेरगिरी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज वारंवार तहकूब करण्यात झाले होते.  परंतु यापूर्वीच राज्यांना ओबीसींची यादी तयार करण्याचे अधिकार देणारे राज्यसभेतील एक महत्त्वाचे विधेयक जवळपास सहा तास चर्चा करून मंजूर करण्यात आले.

    संविधान (१२७ वी दुरुस्ती) विधेयक, २०२१ सभागृहात मंजूर झाल्यावर साधारण विमा व्यवसाय (राष्ट्रीयीकरण) दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला.

    साधारण विमा व्यवसाय दुरुस्ती विधेयकावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवायचे, अशी मागणी करत गोंधळ घातला .परंतु गोंधळात सरकारने हे विधेयक मंजूर केले.

    सरकारच्यावतीने दावा करण्यात आला की, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातील मार्शल आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला, तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारवर विरोधी खासदारांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला.

    या झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्या १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. नंतर विमा संबंधी विधेयक मंजूर झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज संध्याकाळी ७.०४ पर्यंत अर्धा तास तहकूब करण्यात आले होते.  दरम्यान गोंधळ घालणारे खासदार सभापतींच्या आसनाच्या अगदी जवळ आले आणि त्यांनी कागदपत्रे फाडून हवेत फेकून दिली.

    मल्लिकार्जुन खर्गेंचा आरोप

    सभागृहात विरोध प्रदर्शनादरम्यान उपस्थित असलेल्या काही महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या महिला खासदारांसोबत धक्काबुकी केली आणि त्यांचा अपमान केला. विरोधी पक्षांचे खासदार निषेधासाठी आसानाकडे गेले तेव्हा पुरुष आणि महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचा वेढा तयार केला असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

    ते म्हणाले, “आमच्या महिला खासदारांना धक्काबुक्की केली जात आहे… महिला खासदारांचा अपमान केला जात आहे… महिला खासदार सुरक्षित नाहीत… हा संसद आणि लोकशाहीचा अपमान आहे.”

    शरद पवार म्हणाले, हा लोकशाहीवर हल्ला-

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “आपल्या ५५ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत आज (राज्यसभेत) महिला खासदारांवर ज्या प्रकारे हल्ला झाला आहे, ते कधीही पाहिले नाही. ४० हून अधिक महिला आणि पुरुषांना बाहेरून सभागृहात आणण्यात आले. हे वेदनादायक आहे. हा लोकशाहीवर हल्ला आहे.”

    Massive riots in Rajya Sabha, abuse of women MPs allegations of Sharad Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला