विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. फाफामऊ येथे गंगा नदीची पातळी ८५.३१ मीटरवर पोचली आहे तर नैनो येथे यमुना नदीची पातळी ८५.१८ मीटरवर आहे. दोन्ही नद्या धोक्याची पातळी ८४.७३ मीटरपेक्षा अधिक उंचीवरून वाहत आहेत.Massive flood to river ganga and jamuna in Up
दोन्ही नद्यांची पातळी वाढल्याने किनाऱ्यालगत असलेले लहान मोठे भाग तसेच सलोरी, राजापूर, अशोकनगरपर्यंत पाणी पोचले आहे. त्यामुळे लोकांना गच्चीवर राहावे लागत आहे. यादरम्यान बचावकार्य जोरात सुरू असून एनडीआरएफकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन केले जात आहे.
- ममतांच्या “खेला होबे”ची अखिलेशकडून कॉपी; उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे “काम होगा” प्रचारगीत लॉन्च
नदीची वाढती पातळी लक्षात घेता नागरिकांना तत्काळ घर सोडण्याचे आवाहन केले जात आहे. नद्यांना पूर आल्यामुळे हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत आहे. शेकडो घरांचा पहिला मजला पाण्याखाली गेला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही दिवसांपूर्वी ज्या रस्त्यावरून वेगाने वाहने धावत होती, तेच रस्ते पाण्याखाली गेल्याने आता नौका जात आहेत.
ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क तुटला आहे. संगमकडे जाणारे रस्ते सुमारे पाण्याखाली गेले आहेत. गंगा नदीकिनाऱ्यावर कछारी भागात भाड्याने राहणारे विद्यार्थी देखील पाण्यात अडकले असून ते पहिल्या मजल्यावर राहत आहेत.
Massive flood to river ganga and jamuna in Up
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडियाद्वारे न्यायालयाबाहेर समांतर न्यायालय चालवू नका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
- संवादावर लक्ष केंद्रीत करा, उडतउडत ऐकायचं सोडून द्या…
- नवीन करकायदा लागू झाल्यावर केंद्र सरकार आठ हजार कोटी रुपये कंपन्यांना परत देणार
- एटीएममध्ये रोकड नसल्यास बॅँकांना होणार दंड, ग्राहकांना होणाऱ्या गैरसोईंमुळे रिझर्व्ह बॅँकेचा निर्णय्
- आसाममधील शाळेच्या मदतीसाठी धावले दूधवाले, सहकारी संस्थांतील दोन हजार दूधवाले शाळेसाठी लीटरमागे १५ पैसे देणार