• Download App
    गेच्या पुरामुळे बिहारमध्ये नागरिक हवालदिल, हजारो एकर जमीन पाण्याखाली । Massive flood to ganga river in Bihar

    गंगेच्या पुरामुळे बिहारमध्ये नागरिक हवालदिल; हजारो एकर जमीन पाण्याखाली

    विशेष  प्रतिनिधी

    पाटणा : बिहारची राजधानी पाटण्यापासून बक्सरपर्यंत अनेक जिल्ह्यात गंगा नदीची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाटणा, भागलपूर, मुंगेरच्या सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना पाण्याने वेढले आहे. Massive flood to ganga river in Bihar

    सध्या मुसळधार पावसाने मध्य व उत्तर भारतात कहर माजविला आहे. मध्य प्रदश, राजस्थान, उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहारमध्येही आता गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.



    पूर्व बिहारच्या खगाडिया आणि कटिहार जिल्ह्यातही गंगा नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात १२ ऑगस्टपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    बक्सर येथे काल पाणी पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा ३१ सेंटीमीटरपेक्षा अधिक राहिली. पाटणा शहरात गांधी घाट येथे गंगा नदीने धोक्याच्या पातळीपेक्षा ९८ सेंटीमीटर अधिक पाण्याने पातळी गाठली.

    Massive flood to ganga river in Bihar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक