Massive fire at furniture market in Delhi : राजधानी दिल्लीत रात्री उशिरा आगीचे तांडव पाहायला मिळाले. रात्री उशिरा शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली. या अग्निकांडात तब्बल 200 दुकाने भस्मसात झाली. असे सांगितले जात आहे की, फर्निचर मार्केटमध्ये रात्री पावणे एकच्या दरम्यान आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने तेथे धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 29 बंब तैनात करण्यात आले. Massive fire at furniture market in Delhi’s Shastri Park area, 200 shops burnt to ashes
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत रात्री उशिरा आगीचे तांडव पाहायला मिळाले. रात्री उशिरा शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली. या अग्निकांडात तब्बल 200 दुकाने भस्मसात झाली. असे सांगितले जात आहे की, फर्निचर मार्केटमध्ये रात्री पावणे एकच्या दरम्यान आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने तेथे धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 29 बंब तैनात करण्यात आले.
तथापि, अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणेपर्यंत फर्निचर मार्केटमधील सुमारे 200 दुकाने जळून खाक झाली होती. सुदैवाने या घटनेत एकही जीवितहानी झाली नाही, परंतु व्यापाऱ्यांचे मात्र कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार फर्निचर मार्केटमध्ये रात्री 12.30 वाजता आगीची माहिती मिळाली. या मार्केटमध्ये 250 फर्निचर व हार्डवेअरची दुकाने होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 29 अग्निशमन बंब बोलावण्यात आले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला कठोर परिश्रम घ्यावे लागले. अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. या घटनेत 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.
Massive fire at furniture market in Delhi’s Shastri Park area, 200 shops burnt to ashes
महत्त्वाच्या बातम्या
- Lockdown In Maharashtra : महाराष्ट्रात आज लॉकडाऊनच्या घोषणेची शक्यता, मुख्यमंत्री ठाकरे घेणार टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय
- राज्यात शनिवारी ५५ हजारांवर लोकांना कोरोना , ५३ हजार जण आजारातून मुक्त ; ३०९ जणांचा मृत्यू
- राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे नुकसान
- Corona Outbreak In India : कोरोना रुग्णसंख्येचा भारतात विस्फोट, एका दिवसात आढळले 1.52 लाख रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक
- जम्मू-कश्मीरमधील शोपियानमध्ये चकमक ; गोळीबारात तीन दहशतवादी ठार