वृत्तसंस्था
अहमदाबाद : तिहारच्या जेलमध्ये मनी लॉड्रिंग प्रकरणात बंद असलेले दिल्लीच्या आम आदमी पार्टीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचा मसाज सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियात सत्येंद्र जैन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मोठा गजर ओळखला आहे. Massage by Satyendra Jain in Jail; But VIP treatment in jail to Amit Shah
पण अरविंद केजरीवालांनी मात्र सत्येंद्र जैन यांचा बचाव केला आहे. सत्येंद्र जैन यांचा मसाज चालू असल्याचे जरी भाजपवाले म्हणत असले तरी त्यांच्यावर फिजिओथेरपी चालू आहे. कारण डॉक्टरांनी त्यांना तसा सल्ला दिला आहे. त्यांना जेलमध्ये कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
पण त्याचवेळी केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरच वेगळा आरोप लावला आहे. अमित शाह हे जेव्हा गुजरात मध्ये मंत्री होते आणि त्यांच्यावर दंगली संदर्भात आरोप होते. त्यावेळी त्यांनाच तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी यांचा बचाव करताना अमित शाह यांच्यावर प्रत्यारोप केला असला तरी सत्येंद्र जैन यांच्यावर कोणतीही फिजिकल थेरेपी चालू नव्हत नसल्याचा खुलासा तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी आधीच केला होता. मात्र, तरी देखील अरविंद केजरीवालांनी सत्येंद्र जैन यांची पाठराखण करताना त्यांच्यावर फिजिओथेरेपी चालू असल्याचा दावा केला आहे.
Massage by Satyendra Jain in Jail; But VIP treatment in jail to Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- गुजरात निवडणूक : पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री पटेलांना नवे टार्गेट; नरेंद्रभाईंचे रेकॉर्ड भूपेंद्रभाईंनी तोडावे; पण कसे?, ते वाचा
- ठाकरे – आंबेडकर एकत्र; महाराष्ट्रात पंचरंगी लढतीची नांदी
- सावरकरांची बदनामी : राहुल गांधींना इतिहासाचे अल्पज्ञान, त्यांना कोणी सिरीयसली नाही घेत; अमित शाहांचा टोला
- नोकरीची संधी : उद्या 22 नोव्हेंबरला 71000 युवकांना नियुक्ती पत्रे; देशभर 45 शहरांमध्ये रोजगार मेळावे