• Download App
    अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क अनिवार्य । Masks mandatory once again in many states

    अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क अनिवार्य

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. वाढत्या संसर्गामुळे सर्वसामान्य नागरिकांची तसेच सरकारची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. Masks mandatory once again in many states

    आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे २५२७ रुग्ण आढळले आहेत, ज्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. यादरम्यान ३३ जणांचा मृत्यू झाला. तथापि, १६५६ लोकांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही १५,०७९ वर पोहोचली, ही चिंतेची बाब आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण५, २२,१४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, या कालावधीत एकूण ४,२५,१७,७२४ लोक देखील निरोगी झाले आहेत.



    एकूण प्रकरणे: ४,३०,५४,९५२ सक्रिय प्रकरणे: १५,०७९ एकूण पुनर्प्राप्ती: ४,२५,१७,७२४ एकूण मृत्यू: ५,२२,१४९ एकूण लसीकरण: १,८७,४६,७२,५३६ आज कालच्या तुलनेत ७६ अधिक रुग्ण आढळून आले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत २४५१ नवीन संसर्ग बाधित आढळून आले असून ५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ७६ संक्रमित लोकांमध्ये वाढ झाली आहे.

    दिल्लीत चिंता : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत. गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे १,०४२ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी या जीवघेण्या विषाणूमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या दिल्लीतील संसर्ग दर ४.६४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

    महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १२१ नवीन रुग्ण

    महाराष्ट्रात गेल्या २४ तासात कोरोनाचे १२१ नवीन रुग्ण आढळून आले असून एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर येथे गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६८ नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत १७९ रुग्ण आढळले आहेत.

    Masks mandatory once again in many states

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य