• Download App
    मार्क्सवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले, त्यांच्यावर कधी सोडली का सीबीआय!!; ममतांचा भाजपला टोला |Marxists committed unspeakable atrocities, did the CBI ever release them !!; Mamata's BJP tola

    मार्क्सवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले, त्यांच्यावर कधी सोडली का सीबीआय!!; ममतांचा भाजपला टोला

    वृत्तसंस्था

    भवानीपूर : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भवानीपूर मधील पोटनिवडणूक जोरावर आहे. आपल्या सगळ्या लवाजम्यासह ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमध्ये तळ ठोकला आहे. त्यांनी भाजपवर अनेक सभांमधून जोरदार तोफा डागल्या.Marxists committed unspeakable atrocities, did the CBI ever release them !!; Mamata’s BJP tola

    पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनन्वित अत्याचार केले. पण त्यांच्यावर कधी भाजपने सीबीआय किंवा ईडी या संस्थांना सोडले नाही. त्यांचा तपास केला नाही आणि आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर मात्र त्यांचा दात आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.



    प्रचाराच्या सभांमध्ये ममतांनी आज तुफान फटकेबाजी करून घेतली. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते कोणी गुंड माफिया नाहीत. ते सामान्य घरातूनच आले आहेत. पण भाजपने आमची प्रतिमा देशभरात गुंड माफिया अशी रंगवली आहे.

    वास्तविक पाहता त्यांनीच बाहेरच्या राज्यांमधून गुंड आणि माफिया आणून बंगालमध्ये घुसवले आहेत आणि ते येथे हिंसाचार माजवत आहेत. पण आम्ही त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला.

    प्रचारासाठी आता तीन दिवसांचा अवधी उरला असून तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे नेते एकमेकांवर तुफान हल्ले चढवत आहेत. भाजपचा उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांनी देखील प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. जेवढा ममता बॅनर्जी यांचा भाजपवरचा हल्ला प्रखर आहे, तेवढाच प्रखर हल्ला प्रियांका टिबरेवाल या आपल्या प्रचार सभांमधून ममता बॅनर्जी यांच्यावर चढवत आहेत. त्यामुळे नंदिग्राम सारखीच चुरस भवानीपूरमध्ये पाहायला मिळत आहे.

    Marxists committed unspeakable atrocities, did the CBI ever release them !!; Mamata’s BJP tola

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे