• Download App
    ‘मारुती’ कंपनीची इलेक्ट्रिक वाहनांबाबत सावध पावले; आणखी वर्षे पारंपरिक वाहने विकणार ।‘Maruti’ company cautioned about electric vehicles; Will sell conventional vehicles for more years

    ‘मारुती’ कंपनीची इलेक्ट्रिक वाहनांबाबत सावध पावले; आणखी वर्षे पारंपरिक वाहने विकणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडियाने इलेक्ट्रिक वाहनांबाबत सावध पावले टाकली असून या क्षेत्रात २०२५ नंतरच पाऊल टाकणार असल्याचे म्हंटले आहे. ‘Maruti’ company cautioned about electric vehicles; Will sell conventional vehicles for more years

    कंपनीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले, सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी कमी आहे. महिन्याला सुमारे १०,००० वाहनांची विक्री सुरू होईल, तेव्हाच कंपनी या क्षेत्रात प्रवेश करेल.

    भार्गव म्हणाले, पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. बॅटरी, वाहनांच्या चार्जिंगच्या सुविधा आणि अखंडित वीजपुरवठा यांसारख्या सुविधांचा अजून विकास झालेला नाही.यासाठी किती खर्च येईल याबाबत भाष्य करणे अवघड आहे. तसेच सध्या इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे मारुती सुझुकी सीएनजी वाहनांच्या विक्रीवर भर देत आहे.



    स्पर्धक कंपन टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना भार्गव म्हणाले की, जर आम्ही सध्या वर्षांला २० लाख वाहनांची विक्री करत असू आणि अशावेळी वर्षांला जेमतेम लाखभर वाहनांचीच विक्री करता आली तर त्यात काय अर्थ आहे? मात्र भविष्यात कंपनी या क्षेत्रात नक्की प्रवेश करेल.

    निव्वळ नफ्यात ६६ टक्के घसरण

    मारुती सुझुकीला सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत ४७५.३० कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत ६५.३५ टक्कय़ांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीने १३७१.६० कोटींचा नफा नोंदविला होता.

    ‘Maruti’ company cautioned about electric vehicles; Will sell conventional vehicles for more years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!