• Download App
    लग्न करून आणले आणि मित्रांच्या हवाली केले, शिक्षिकेवर पतीसह पाच जणांचा सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार|Married and handed over to friends, teacher gang-raped by five including husband

    लग्न करून आणले आणि मित्रांच्या हवाली केले, शिक्षिकेवर पतीसह पाच जणांचा सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मेट्रोमोनियल वेबसाइटवरून एका शिक्षिकेशी लग्न करून मित्रांच्या हवाली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्न झाल्यापासून गेले पंचेचाळीस दिवस या शिक्षिकेवर पतीसह त्याच्या चार मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. मित्र पत्नीवर बलात्कार करत असताना पती पाहत असे.Married and handed over to friends, teacher gang-raped by five including husband

    इंदूरमध्ये हा प्रकार घडला आहे. बिल्डर असलेल्या राकेश विश्वकर्मा यांनी मेट्रोमोनियल वेबसाइटच्या माध्यमातून छत्तीसगडमध्ये राहणाºया शिक्षिकेसोबत मैत्री केली होती. तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आरोपीने 24 आॅक्टोबर रोजी महिलेसोबत लग्न केलं आणि तिच्यासोबत इंदूरमधील फार्म हाऊसवर राहू लागला.



    लग्नाच्या काही दिवसांनंतर बिल्डर राजेश पत्नीवर अत्याचार करीत होता. तो इतका क्रूर आणि रानटी होता की आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना पत्नीला दारूचे पेग बनवायला सांगत होता. अनेकदा पत्नीला निर्वस्त्र करून मित्रांसमोर आणत होता. अनेकदा आरोपीने महिलेच्या शरीरावर जळत्या सिगारेटचे चटके दिले.

    प्रायव्हेट पार्टवरही जळत्या सिगारेटचे चटके दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. शरीरभर चावे घेतले. याशिवाय फार्म हाऊसमध्ये पती तिला मारहाण करीत होता. तब्बल दीड महिने महिलेने हा अत्याचार सहन केला आहे. आपल्या मित्रांसह शरीर संबंध ठेवण्याची जबरदस्तीही करीत होता.

    आरोपीचे मित्र अंकेश बघेल, विवेक विश्वकर्मा आणि विपीन भदौरिया यांनी अनेकदा महिलेवर बलात्कार केले. यानंतर आरोपी धारदार चाकून पत्नीला मारण्याची धमकी देत होता.एकेदिवशी पीडिता त्याच्या घरातून पळून छत्तीसगडमधील आपल्या माहेरी गेली.

    यानंतर आरोपीने मित्र विपीन भदौरियाला पत्नीला मारण्यासाठी छत्तीसगडला पाठवलं. यानंतर पीडितेने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणात आरोपीसह दोघांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

    Married and handed over to friends, teacher gang-raped by five including husband

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के