• Download App
    चित्रपट उद्योगातील माफिया, लेबर युनीयनच्य पदाधिकाऱ्याच्या त्रासामुळे मराठी कला दिग्दर्शकाची आत्महत्या|Marathi art director commits suicide due to mafia in film industry, harassment of Labor union office bearers

    चित्रपट उद्योगातील माफिया, लेबर युनीयनच्य पदाधिकाऱ्याच्या त्रासामुळे मराठी कला दिग्दर्शकाची आत्महत्या

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : चित्रपट उद्योगात लेबर युनीयनच्या माध्यमातून माफियागिरीचा बळी एक मराठी कला दिग्दर्शक ठरला आहे. लेबर युनीयनच्या एका पदाधिकाऱ्याच्या त्रासामुळे प्रोजेक्ट सुरू होत नसल्याने राजेश साप्ते यांनी आत्महत्या केली आहे. पुण्यात आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून आपल्या आत्महत्येचे कारण सांगितले आहे.Marathi art director commits suicide due to mafia in film industry, harassment of Labor union office bearers

    मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक म्हणून  राजू साप्ते प्रसिध्द होते. त्यांनी आज आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. तत्पूर्वी एक सुसाईड व्हिडिओही त्यांनी बनवला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, नमस्कार मी राजेश मारुती साप्ते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे.



    मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत.

    सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत. माझे पुढचे काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. पण, राकेश मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरु करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावा लागला. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे.  मला न्याय मिळावा.

    महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले की,  यापुढे कोणताही निमार्ता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकीच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाºयाला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही.

    राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निमार्ता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा.

    Marathi art director commits suicide due to mafia in film industry, harassment of Labor union office bearers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!