विशेष प्रतिनिधी
मुंबई :Muslim reservation काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मराठा आरक्षणावर त्यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देऊ असा शब्द दिलेला नाही, पण काँग्रेस सत्तेवर आल्यास मुस्लिम आरक्षणाचा विचार करू, असे वक्तव्य तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आज सोलापुरातल्या पत्रकार परिषदेत केले.Muslim reservation
महाराष्ट्रात ओबीसींमधून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी राजकीय घमासान केले. त्यांनी मराठा + मुस्लिम + दलित कॉम्बिनेशन करून उमेदवार उभे करायचा धाक घातला. परंतु नंतर शरद पवारांच्या सूचनेनुसार माघार घेतली. याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांनी केला, पण एकूण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात राजकीय घमासन व्हायचे ते झालेच. त्यामध्ये काँग्रेस कडेलाच उभी राहिली. काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणतीच भूमिका न घेता नरो वा कुंजरो वा अशी सोयीची भूमिका घेतली.
पण मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न येताच काँग्रेसने अनुकूल भूमिका घेतली. काँग्रेस सत्तेवर आली, तर महाराष्ट्रात देखील 4 % मुस्लिम आरक्षणाचा विचार करू, असे रेवंत रेड्डी म्हणाले. त्यासाठी त्यांनी तेलंगणाचे उदाहरण दिले. तेलंगणात मुस्लिमांना 4 % आरक्षण दिले होते, ते काँग्रेस सरकारने 5 % केले. तेलंगणात शिक्षकांच्या भरतीमध्ये 11000 शिक्षकांची भरती केली, तेव्हा मुस्लिम आरक्षणातून 720 मुस्लिम शिक्षकांची भरती केली. याची माहिती रेवंत रेड्डी यांनी दिली.
मराठा आरक्षणावर महाराष्ट्रात जाहीरनाम्यामध्ये शब्द न देणाऱ्या काँग्रेसने मुस्लिम आरक्षणाचा विषय येताच मात्र ताबडतोब तो असा मान्य करून टाकला.
Maratha reservation in Congress + Mavia’s manifesto, but definitely think about Muslim reservation if they come to power!!
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा, मनोज जरांगे यांचे छगन भुजबळांच्या येवल्यात आवाहन
- Rajnath Singh संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Rahul & priyanka Gandhi भावा – बहिणीच्या भाषणांची प्रादेशिक स्क्रिप्ट; ठाकरे + पवारांमागे काँग्रेसची फरफट!!
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई चकमकीत पाच जण ठार