• Download App
    राजस्थानमध्ये अनेक माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश Many former administrative officers joined BJP in Rajasthan

    राजस्थानमध्ये अनेक माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भाजपामध्ये केला प्रवेश

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली लोकांचा भाजपवर अतूट विश्वास, असं  भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राजस्थान भाजपामध्ये आज  एकूण 17 जणांनी  प्रवेश केला आहे.  ज्यामध्ये काही नेते आणि माजी प्रशासकीय अधिकारीही आहेत. ज्यामध्ये माजी प्रशासकीय अधिकारी व रैगर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भंवरलाल नवल, बैरवा महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष लालाराम बैरवा, माजी प्रशासकीय अधिकारी कैलाश वर्मा, निवृत्त आयएएस हनुमानसिंग भाटी, माजी आयपीएस डॉ.महेश भारद्वाज, कुंवर राव गगन सिंग, निवृत्त आयुक्त ओमकृष्ण सिंह, माजी आयुक्त डॉ. मीना, सेवानिवृत्त डीईओ राजाराम मीना, सेवानिवृत्त शिक्षण संचालक बहादूर सिंग गुर्जर, ओमप्रकाश बगडा, निवृत्त आयकर आयुक्त नरेंद्र गौड, भूदेव देवडा, दयानंद सक्करवाल, निवृत्त पोलीस अधिकारी खेमराज खोलिया, धनेश्वर आहारी आणि प्रशासकीय सेवेचे मातराम रिनवा यांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले आहे. Many former administrative officers joined BJP in Rajasthan

    भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी अरुण सिंह यांनी सदस्यत्व कार्यक्रमात सांगितले की, भाजपाचे सदस्यत्व घेण्यासाठी राज्यातील सर्व समाजांमध्ये उत्साह व उत्सुकता आहे. राज्यातील प्रत्येक वर्ग काँग्रेस सरकारला कंटाळला आहे. त्यामुळे सदस्यत्व कार्यक्रमातही दलित समाजातील आजी-माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर विश्वास ठेवून विविध समाजातील लोकांनी बिनशर्त भाजपची निवड केली आहे. येत्या निवडणुकीत राज्यातील जनता युवा, शेतकरी आणि दलितविरोधी काँग्रेस सरकारला उखडून टाकेल, असा निर्धार आता राज्यातील जनतेने केला आहे.

    भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी म्हणाले की, राज्यातील विविध क्षेत्रातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे भाजप परिवार स्वागत करतो. राजस्थानमध्ये एक ट्रेंड सुरू झाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली लोकांचा भाजपवर अतूट विश्वास आहे. आज राज्यातील काँग्रेसच्या भ्रष्ट सरकारने वीज कपात, महागडी वीजबिल, पेपरफुटी, पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट, महिलांवरील अत्याचार , तरुण आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने मोडीत काढत राज्यातील प्रत्येक वर्ग दुखावला आहे. सदस्यत्व घेतलेल्या सर्वांना माहीत आहे की देशात आणि राज्यात सुशासन देणारा कोणता पक्ष असेल तर तो भाजप आहे.

    Many former administrative officers joined BJP in Rajasthan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!