विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक आनंदाची बातमी आली. शूटर मनू भाकरने एकाच ऑलिंपिक मध्ये सलग 2 पदके मिळवायची कमाल करून दाखविली. भारताला दुसरे पदकही नेमबाजीत मिळाले. मनू भाकरने इतिहास रचला. Manu Bhaker and Sarabjot for winning the Bronze medal in the 10m Air Pistol Mixed Team
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदकं 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत मिळवून दिले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग जोडीला हे कांस्य पदक मिळाले. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदक मिळवणारी मनू पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी मनू भाकर पहिली भारतीय ठरली होती.
परवाच मनूने 10 मीटर पिस्टल रेंजवर अशीच कमाल करत कांस्य पदक मिळवले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिला फोन करून तिचे अभिनंदन केले होते. टोकियो ऑलिंपिक मध्ये तिचे पिस्टल खराब झाल्याने तिला एकही पदक मिळू शकले नव्हते, पण पॅरिस ऑलिंपिक मध्ये तिने कमाल करत भारताला सलग 2 पदके मिळवून दिली. पंतप्रधान मोदींशी बोलताना तिने आत्मविश्वास व्यक्त केलाच होता, तो तिने सार्थ ठरवून दाखवला.
Manu Bhaker and Sarabjot for winning the Bronze medal in the 10m Air Pistol Mixed Team
महत्वाच्या बातम्या
- यूपी सरकारने लव्ह जिहादवर जन्मठेपेचे विधेयक आणले; धर्मांतर रोखण्यासाठी घेतला निर्णय, तुरुंगवास आणि दंडात वाढ
- राज्यसभेत ‘जया अमिताभ बच्चन’ म्हटल्यावर जया बच्चन संतापल्या!
- भारतात व्हॉट्सॲप बंद होणार का? आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले ‘हे’ उत्तर
- आज पुन्हा राहुल गांधी आणि काँग्रेसची अपरिपक्वता जनतेसमोर उघड झाली ‘