केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची घेणार बैठक
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात करोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे ८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान २३०० हून अधिक प्रकरणे वाढली आहेत. कोरनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले असून, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया उद्या (शुक्रवार) सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील करोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. Mansukh Mandaviya to hold review meet with Health Ministers of States UTs on COVID situation
देशात आढळले आढळले करोनाचे ५ हजार ३३५ नवीन रुग्ण –
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, गेल्या २४ तासांत देशात करोना विषाणूचे ५ हजार ३३५ नवीन रुग्ण आढळले आहेत. करोना सक्रिय प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे. सक्रिय प्रकरणे आता २५ हजार ५८७ पर्यंत वाढली आहेत. प्रदीर्घ काळानंतर देशात एकाच दिवसात पाच हजारांहून अधिक करोनाची प्रकरणे समोर आली आहेत. काल म्हणजेच बुधवारी ४ हजार ४३५ करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते.
दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी ५०० पेक्षा अधिक प्रकरणे –
देशाची राजधानी दिल्लीतही करोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंत्रालयाने सांगितले की, दिल्लीत गेल्या २४ तासांत ५०९ करोना रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, दिल्लीमध्ये करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १७९५ वर पोहोचली आहे. याशिवाय नोएडामध्ये ४७ रुग्ण आढळले आहेत, तर गाझियाबादमध्ये एकूण १३ रुग्ण आढळले आहेत.
Mansukh Mandaviya to hold review meet with Health Ministers of States UTs on COVID situation
महत्वाच्या बातम्या
- आंतरधर्मीय विवाहावरून नंदुरबारमध्ये मध्यरात्री हिंसक संघर्ष; दगड-विटांचा मारा, पोलिस जखमी
- कर्नाटकच्या मंत्र्याला अल्पसंख्याकांविरोधात द्वेषपूर्ण भाषण करणे महागात, निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई
- PM मोदींनी मी चूक असल्याचे सिद्ध केले, भाजप सरकार पुरस्कार देईल असे वाटलेही नव्हते, पद्मश्री मिळाल्यानंतर शाह रशीद अहमद कादरी भावुक
- सुप्रीम कोर्ट : ईडी – सीबीआय तपासात पुढाऱ्यांना जन सामान्यांचाच न्याय; विरोधकांच्या “ऑक्सिजन” नळीवर पाय!!