Mansukh Mandaviya Slammed Rahul Gandhi : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जुलै महिन्यात देशात 13 कोटीहून अधिक लस देण्यात आल्या आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या एका ट्विटला प्रतिसाद म्हणून हे ट्विट केले आहे ज्यात राहुल यांनी कोरोना लसींच्या अनुपलब्धतेवर प्रश्न उपस्थित केले होते. मंडाविया यांनी लिहिले, ‘या महिन्यात (ऑगस्ट) यात आणखी वेग येणार आहे. या कामगिरीबद्दल आम्हाला आमच्या आरोग्यसेवकांचा अभिमान आहे. आता तुम्हाला त्यांचा आणि देशाचाही अभिमान वाटला पाहिजे. Mansukh Mandaviya Slammed Rahul Gandhi Over His Questions On Corona Vaccination said More Than 13 Crore Vaccines Administered In July
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मंडाविया यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जुलै महिन्यात देशात 13 कोटीहून अधिक लस देण्यात आल्या आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या एका ट्विटला प्रतिसाद म्हणून हे ट्विट केले आहे ज्यात राहुल यांनी कोरोना लसींच्या अनुपलब्धतेवर प्रश्न उपस्थित केले होते. मंडाविया यांनी लिहिले, ‘या महिन्यात (ऑगस्ट) यात आणखी वेग येणार आहे. या कामगिरीबद्दल आम्हाला आमच्या आरोग्यसेवकांचा अभिमान आहे. आता तुम्हाला त्यांचा आणि देशाचाही अभिमान वाटला पाहिजे.
राहुल गांधी यांच्यावर टीका करतानाच मंडावीयांनी त्यांच्यावर लसीकरणाच्या नावावर केवळ राजकारण केल्याचा आरोप केला. आरोग्यमंत्र्यांनी दुसर्या ट्विटमध्ये लिहिले, ‘असे ऐकले आहे की तुम्हीसुद्धा 13 कोटी लोकांपैकी एक आहात ज्यांचे जुलैमध्ये लसीकरण करण्यात आले होते. परंतु तुम्ही आमच्या शास्त्रज्ञांसाठी एक शब्दही बोलला नाही, जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन केले नाही. याचा अर्थ तुम्ही लसीकरणाच्या नावावर क्षुद्र राजकारण करत आहात. वास्तविक, लसीची नाही, तर तुमच्यात परिपक्वतेची कमतरता आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी सकाळी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये कोरोना लसीकरणाचे अपयश दाखवणाऱ्या अनेक बातम्यांचे स्क्रीनशॉट जोडले गेले आणि केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आले आहे. यासह त्यांनी लिहिले की, ‘जुलै गेला, लसीची कमतरता संपली नाही.’ यासह त्यांनी व्हेअर आर व्हॅक्सीन्स हॅशटॅग वापरला आहे. राहुल गांधी केंद्राच्या लसीकरण धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
Mansukh Mandaviya Slammed Rahul Gandhi Over His Questions On Corona Vaccination said More Than 13 Crore Vaccines Administered In July
महत्त्वाच्या बातम्या
- CBSE CTET 2021 : परीक्षा होणार ऑनलाइन, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एक्झाम पॅटर्नमध्ये बदल.. वाचा सविस्तर!
- Tokyo Olympics : सिंधुने रचला इतिहास, भारतासाठी जिंकले आणखी एक मेडल, चिनी खेळाडूला हरवून कांस्य पदकावर कोरले नाव
- ओवैसी तिहेरी तलाक कायद्याला म्हणाले असंवैधानिक, केंद्राला विचारले- पेगाससवर संसदेत चर्चेची भीती का?
- GST Collection : जीएसटी कलेक्शनमध्ये 33 % उसळी, पुन्हा एकदा आकडा 1 लाख कोटींच्या पुढे
- जबरदस्त : जम्मू -काश्मिरात देशद्रोह आणि दगडफेक करणाऱ्यांना ना पासपोर्ट मिळणार, ना सरकारी नोकरी; आदेश जारी