जम्मू आणि काश्मीरमध्ये नोकरशहाऐवजी सक्रीय राजकारण्याला उपराज्यपाल नेमण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाऊल यशस्वी ठरले. मनोज सिन्हा यांनी आपली कामगिरी चोख बजावत राजकीय अडथळे दूर करून राजकीय पक्षांमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू केली आहे.Manoj Sinha performs well, removes political impediment in Jammu and Kashmir and starts dialogue process
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये नोकरशहाऐवजी सक्रीय राजकारण्याला उपराज्यपाल नेमण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाऊल यशस्वी ठरले. मनोज सिन्हा यांनी आपली कामगिरी चोख बजावत राजकीय अडथळे दूर करून राजकीय पक्षांमध्ये संवादाची प्रक्रिया सुरू केली आहे.
सुमारे तेरा महिन्यांपूर्वी मनोज सिन्हा यांची जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. मात्र, त्यांचे पूर्वसरी सतपाल मलिक यांच्याप्रमाणे त्यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोप टाळले. त्याचबरोबर आत्तापर्यंत नोकरशहा उपराज्यपालांनी केली ती राजभवनापर्यंतच मर्यादित राहण्याची चूकही केली नाही.
सामान्य जनतेसोबत त्यांनी व्यापक संपर्क स्थापित केला. त्याचबरोबर राज्यातील राजकीय नेत्यांसोबतही त्यांचा संवाद सुरू होता. त्याचे फळ म्हणून जम्मू आणि काश्मीरमधील नेत्यांनी पंतप्रधांसोबतच्या बैठकीला उपस्थिती लावली.
पंतप्रधानांसोबतची सुमारे साडेतीन तास चाललेली विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची चर्चा फलदायी ठरली. प्रत्येक पक्षाने या बैठकीबाबत समाधान व्यक्त केले आहे. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. प्रत्येकाचे म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतपणे ऐकून घेतले.
मनोज सिन्हा गेल्या तेरा महिन्यांपासून ज्या पध्दतीने काम करत आहेत त्याचे हे यश आहे. उपराज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यावर एक महिन्याच्य आतच त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांच्यासोबत चहापानाची इच्छा व्यक्त केली.
यावेळी फारुख अब्दुल्ला यांचे केंद्र सरकारसोबतचे संबंध ताणले गेलेले होते. त्यांनी सिन्हा यांना विचारले की माझ्यासोबत चहापानामुळे दिल्ली नाराज होणार नाही का? यावेळी मनोज सिन्हा त्यांना म्हणाले की त्यांच्यामध्ये केवळ एका फोन कॉलचे अंतर आहे. त्यांची जेव्हा कधी इच्छा होईल पंधरा मिनिटांत ते चहा पिण्यासाठी अब्दुल्लांकडे पोहोचू शकतील. मनोज सिन्हा यांनी गेल्या तेरा वर्षांत एकही वादग्रस्त विधान केले नाही. कारण नसताना कोणा नेत्याला आव्हान दिले नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांसोबतचा तणाव हळुहळु निवळत गेला.
कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करताना मनोज सिन्हा यांना ते राज्यपालाच्या भूमिकेत पाहू शकतात असे म्हटले आहे. हा विश्वास मनोज सिन्हा यांनी कमाविला. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी जम्मू आणि काश्मीरचा कारभार पूर्णपणे तटस्थपणे केला.
राज्यातील समस्या कोणत्याही राजकीय चष्म्यातून पाहण्याऐवजी त्यांनी नि:पक्षपणे सगळ्या गोष्टी पाहिलया. त्याचे उदाहरण जम्मू काश्मीरमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत दिसले. या निवडणुकांत सगळ्या पक्षांनी भाग घेतला. एकाही पक्षाने पक्षपातीपणाची तक्रार केली नाही. त्यामुळे राजकीय पक्षांसोबतच जनतेमध्येही त्यांनी विश्वास कमाविला. रजकीय यंत्रणेवरील त्यांचा भरोसा वाढला. त्याचबरोबर राज्यातील जनतेशी त्यांनी थेट संवाद केला.
जनता दरबाराच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील विविध भागांत जनतेशी संवाद साधला. समस्यांवर तत्काळ निर्णय घेतले. यापूर्वीचे राज्यपाल आणि उपराज्यपाल राज्याचा दौरा हेलीकॉप्टरने करत असत. परंतु, धोका पत्करून मनोज सिन्हा यांनी मोटारीने दौरे केले. या दौºयांत ते ठिकठिकाणी थांबत. लोकांची विचारपूस करत. कोरोनाच्या काळात ते स्वत: रुग्णालयांना भेटी देत होते.
शाळा, बांधकामाच्या ठिकाणी स्वत: जाऊन देखरेख करत होते. जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्यांवर त्यांनी संवेदनशिलतेने निर्णय घेतले. एका बालिकेच्या ट्विटवर निर्णय घेत त्यांनी ऑनलाईन क्लास रोखले. त्यामुळे जनतेमध्ये त्यांनी स्थान बनविलेच पण राजकीय पक्षांमध्येही विश्वासाचे वातावरण निर्माण केले.
Manoj Sinha performs well, removes political impediment in Jammu and Kashmir and starts dialogue process
महत्त्वाच्या बातम्या
- प्रियंकांचे पती बेभान, बेजबाबदारपणे गाडी चालविल्याप्रकरणी रॉबर्ट वढेरा यांच्यावर गुन्हा दाखल
- शिक्षकांना राष्ट्रपतींपेक्षाही जास्त पगार, खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा गौप्यस्फोट!
- लोकजनशक्ती पक्षात संघर्ष सुरू असताना भाजपचे मौन वेदनादायक, मोदींचे हनुमान चिराग पासवान यांची खंत
- नाना पटोले यांना कॉँग्रेसश्रेष्ठींनी दिली समज, स्वबळाचा नारा पडला थंड
- देवेंद्र फडणवीस गॉडफादर, मुख्यमंत्री केले तरी कॉँग्रेसमध्ये जाणार नाही, रमेश जारकीहोली यांनी केले स्पष्ट