• Download App
    ‘’...परंतु तुम्ही मला सनातनद्रोही ठरवण्यास एवढी घाई का केली?’’ ‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंताशीर यांनी लिहिली पोस्ट! Manoj Muntashir  the dialogue writer of Adipurush movie  wrote an emotional post to the audience

    ‘’…परंतु तुम्ही मला सनातनद्रोही ठरवण्यास एवढी घाई का केली?’’ ‘आदिपुरुष’चे संवाद लेखक मनोज मुंताशीर यांनी लिहिली पोस्ट!

    आदिपुरुष चित्रपटातील काही संवादांमुळे जनभावना दुखावल्या गेल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :  बहुचर्चित आणि आता तितकाच वादग्रस्त ठरत असलेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने देशभरात खळबळ माजवली आहे. चित्रपटाची कथा, चित्रपटातील संवाद यावर लोकांचे विशेषता हिंदू संघटनांचे खूप आक्षेप आहेत. या पार्श्वभूमीवर आता आदिपुरुष चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलणार असल्याची बातमी येत आहे. ते सुधारित केले जातील आणि या आठवड्यात ते चित्रपटात समाविष्ट केले जातील, असे  सांगितले गेले आहे. दरम्यान हे संवाद लिहिणारे मनोज मुंताशीर यांनी प्रेक्षकांना उद्देशून एक  भावनिक पोस्ट आपल्या सोशली मीडिया अकाउंटवर लिहिली आहे. जी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. Manoj Muntashir  the dialogue writer of Adipurush movie  wrote an emotional post to the audience

    आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंताशीर म्हणतात, ‘’रामकथेमधून  पहिला धडा मिळतो तो म्हणजे प्रत्येक भावनेचा आदर करणे. बरोबर, चूक हे काळानुसार बदलते परंतु भावना कायम राहते. आदिपुरुष मध्ये मी चार हजारांहून अधिक ओळींचे संवाद लिहिले, पाच ओळींमुळे काही भावना दुखावल्या गेल्या. त्या शेकडो ओळींमध्ये जिथे श्रीरामाचे गुणगाण केले, सीतामातेच्या पावित्र्याचे  वर्णन केले, त्यासाठी प्रशंसाही मिळायला हवी होती, ती का नाही मिळाली माहीत नाही.’’

    याचबरोबर ‘’माझ्या बांधवांनी सोशल मीडियावर माझ्याबद्दल अशोभनीय शब्दप्रयोग केला. तेच माझे आपले, ज्यांच्या आईंसाठी मी टीव्हीवर अनेकदा कविता वाचल्या, त्यांनी माझ्याच आईबद्दल अपशब्द वापरले.  मी विचार करत राहिलो, मतभेद असू शकतात मात्र माझ्या बांधवांमध्ये एकदम एवढी कटूता कुठून आली, की ते श्रीरामाचे दर्शनच विसरले, जे प्रत्येक मातेला आपली माता मानत होते. शबरीच्या चरणी असे बसले, जणू काही कौसल्येच्या पायशीच बसले आहेत. होऊ शकतं, तीन तासांच्या चित्रपटात मी तीन मिनिटं काही तुमच्या कल्पनेपेक्षा वेगळं लिहिलं असेल, परंतु तुम्ही माझ्या कपाळावर सनातनद्रोही लिहिण्यास एवढी घाई का केली, मला समजले नाही. तुम्ही  ‘जय श्री राम’ गीत ऐकले नाही, ‘शिवोहम’ नाही ऐकले, ‘राम सिया राम’ नाही ऐकले?  आदिपुरुषमध्ये सनातनची ही स्तुतीही माझ्याच तर लेखणीतून जन्मली आहे. ‘तेरी मिट्टी’ आणि ‘देश मेरे’ पण तर मीच लिहिले आहे. ’’ असंही मुंताशीर यांनी म्हटलं आहे.

    याशिवाय ‘’माझी तुमच्याविषयी काही तक्रार नाही, तुम्ही माझे होता, आहात आणि रहाल. आपण जर एकमेकांविरोधात उभा राहिलो तर सनातनचा पराभव होईल. आम्ही आदिपुरुष चित्रपट सनातनच्या सेवेसाठी बनवला आहे. जो तुम्ही मोठ्यासंख्येने पाहत आहात आणि मला विश्वास आहे पुढेही पाहाल.’’ असं मनोज मुंताशीर यांनी सांगितलं आहे.

    ही पोस्ट का लिहिली? याचं कारण सांगताना मनोज मुंताशीर म्हणाले, ‘’कारण माझ्यासाठी तुमच्या भावनेपेक्षा मोठं आणखी काहीच नाही. मी माझ्या संवादांच्या बाजूने अगणित युक्तिवाद देऊ शकतो, परंतु यामुळे तुमचा त्रास कमी होणार नाही. मी आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शकांनी निर्णय घेतला आहे, की काही संवाद जे तुम्हाला दुखावत आहेत, आम्ही त्यात बदल करू आणि याच आठवड्यात ते चित्रपटात समाविष्ट केले जातील. प्रभू श्रीराम तुम्हा सर्वांवर कृपा करो.’’

    Manoj Muntashir  the dialogue writer of Adipurush movie  wrote an emotional post to the audience

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते

    Judge Verma bench : जज वर्मा खंडपीठाच्या खटल्यांची पुन्हा सुनावणी होणार; 50 हून अधिक खटले प्रलंबित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- अवमान याचिकेसाठी आमची आवश्यकता नाही; अॅटर्नी जनरलची परवानगी घ्या