विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारशी पंगा घेताना मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आज आगपाखड केली. प्रकाश आंबेडकरांना सवाल केले, पण शरद पवार आज सत्तेवर आहेत का?? असा सवाल करत पवारांचा मात्र अप्रत्यक्षपणे बचाव केला. Manoj Jarange’s fire on Fadnavis, questions to Ambedkar
सगळे सोयरे या मुद्द्यावर मनोज जरांगे ओबीसी समाजाकडून अडचणी झाले आहेत प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला मनोज जरांगे यांचे ते गरीब मराठ्यांच्या बाजूने उभे राहिल्यामुळे समर्थन केले होते परंतु सग्यासोयऱ्यांच्या मुद्दा काढून मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून मराठा आरक्षण मागायला सुरुवात केल्यानंतर मात्र ओबीसी समाज आणि प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला नाही. आमदार सदाभाऊ खोत यांनी तर मनोज जरांगे यांनी आपला मोर्चा शरद पवारांकडे वळवावा असा खोचक सल्ला दिला त्यामुळे भडकलेल्या मनोज जरांगे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली. त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सवाल केले. पण शरद पवार आज सत्तेवर आहेत का??, असा दुसरा सवाल करून अप्रत्यक्षपणे पवारांचा बचाव केला.
आरक्षण प्रश्नावर मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन, राज्यात 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. तसेच, सगेसोयरे ही भेसळ असून राज्य सरकारने घाईघाईने दिलेली कुणीबी प्रमाणपत्र रद्द करावीत, अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी केली. सगेसोयरे ही भेसळ आहे. ओरिजनल मंडल कमिशनची यादी जोडल्या गेली होती. 1993 मध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिले गेले, ते शाबूत आहे. मात्र इतर मार्गाने सध्या काही जण मिळवू पाहात आहेत. घाई घाईत आता काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.
दुसरीकडे राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेली 1 महिन्यांची मुदत संपल्याने आता पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग जरांगे यांनी अवलंबला आहे. 20 जुलैपासून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याच, अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीक केली.
मनोज जरांगे म्हणाले :
एक महिन्याचा वेळ आम्ही सरकारला दिला होता. आता, 20 जुलैला आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. मराठा समाजाला गोड गोड बोलायचं हा फडणवीस साहेबांचा दुसरा डाव दिसतो. ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे??, एवढ्या मोठ्या नेत्यांनी. महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवली होती की मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायला लावताय!!
एसी-एसटी आरक्षणाची मागणी नाही
प्रकाश आंबेडकरसाहेब प्रत्येकवेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून औषध घालतील तेच सांगायचे. आज हे इतकं शॉकिंग वाटतंय की आता तेच म्हणाले सगेसोयरेंची अंमलबजावणी करु नका, त्यांचा पक्ष म्हणतोय की नोंदी रद्द करा. पण, एससी-एसटी आरक्षणाची मागणीच नाही मराठ्यांची.
– फडणवीस साहेब तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का?? नेमकं तुमचं काय चाललंय हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना, मराठ्यांना त्रास द्यायचा. म्हणजे तुम्ही आमच्या सोयऱ्यांना त्रास देणार, फडणवीस साहेब तुमचे पण सोयरे आहेत!!
शरद पवारांचा अप्रत्यक्ष बचाव
भाजपचा एवढा मोठा उच्च दर्जाचा नेता मराठ्यांविषयी डाव करायचे. मला तर फडणवीस साहेबांचं आश्चर्य वाटायला लागलय. बार बार एकच शब्द काढायचा, शरद पवारांनी काही दिलं नाही, त्यांच्याकडे मोर्चा वळवा. पणे, ते कुठे सत्तेत आहेत आता?? साष्ट पिंपळगावच्या आंदोलनावेळी त्यांच्याकडेच मोर्चा होता आमचा. दोन टप्प्यात, दोन भूमिकेत वागणाऱ्या अवलादी आमच्या नाहीत. सत्तेवर तुम्ही आहात, त्यांनी काय नुकसान केलं आम्हाला माहिती आहे, म्हणून तुम्हाला करायचंय का आता??
Manoj Jarange’s fire on Fadnavis, questions to Ambedkar
महत्वाच्या बातम्या
- पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर केला छळाचा आरोप!
- शेकापचे जयंत पाटील आणि प्रकाश आंबेडकरांचे दावे म्हणायचे तरी कोणत्या कॅटेगिरीतले??
- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात शासकीय महापूजा; मुख्यमंत्र्यांचे पाऊस अन् शेतकरी सुखासाठी विठ्ठलाला साकडे
- ‘देशात पॅलेस्टाईनचे झेंडे फडकवले जातात, पण राहुल गांधी…’, गिरीराज सिंह यांचा हल्लाबोल