• Download App
    मुस्लिम + धनगर आरक्षणासाठी देखील मनोज जरांगे यांचा एल्गार; कर्नाटक + बंगाल प्रयोग राबवण्याचा डाव!! Manoj jarange pitching for Muslim reservation

    मुस्लिम + धनगर आरक्षणासाठी देखील मनोज जरांगे यांचा एल्गार; कर्नाटक + बंगाल प्रयोग राबवण्याचा डाव!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आत्तापर्यंत मराठा आरक्षण विषयावरून शिंदे फडणवीस पवार सरकारला घेणारे मनोज जरांगे यांनी आता मुस्लिम आणि धनगर आरक्षणासाठी देखील एल्गार पुकारला आहे. यातून कर्नाटक आणि बंगाल प्रयोग राबवण्याचा डाव समोर येतो आहे. Manoj jarange pitching for Muslim reservation

    मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला चार जून रोजी अंतर्वली सराटीत येण्याचे आवाहन केले कोणते सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मागे हटायचे नाही. येवल्यावाल्याचाच मराठा आरक्षणाला विरोध आहे. सरकार मला तुरुंगात टाकेल, तडीपार करील, पण मी हुशार आहे मी या राज्यात जयंतीच्या मराठ्यांना एकत्र करून मोर्चा काढीन. शिंदे – फडणवीस सरकार मला तुरुंगात घालू शकेल पण 6 कोटी मराठ्यांचे काय करणार??, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. पण त्या पलीकडे जाऊन मनोज जरांगे यांनी मुस्लिम आरक्षण मुद्द्याला हात घातला.



    धर्माच्या आधारावर राज्यघटनेनुसार कुठल्याही समाजाला आरक्षण देता येत नाही तरी देखील कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या दोन सरकारांनी मुस्लिमांना ओबीसी आरक्षणात घुसवले ओबीसींच्या आरक्षणाचा वाटा मुस्लिमांना दिला. कर्नाटकात काँग्रेस सरकारने अथवा काढला आणि सगळ्या मुस्लिमांना सरसकट ओबीसी करून टाकले.

    पश्चिम बंगाल मधल्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत जी पाच लाख सर्टिफिकेट यांच्या सरकारने वाटली होती. ती कोलकत्ता हायकोर्टाने रद्द केली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी संतापून थयथयाट केला.

    एकीकडे मुस्लिम आरक्षण हा मुद्दा कायदेशीर पातळीवर सगळीकडून मार खात असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उचलला आणि शिंदे – फडणवीस सरकारला इशारा दिला. त्याचवेळी त्यांनी धनगर आरक्षणाचाही पुकारा केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही कर्नाटक आणि बंगाल यांचाच मुस्लिम आरक्षण प्रयोग ओबीसी आरक्षणात घुसवूनन करणार का??, हा सवाल तयार झाला.

    Manoj jarange pitching for Muslim reservation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य