विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता राहुल गांधींनी टार्गेट केले. दिल्लीतला गांधी लाल्या म्हणून त्यांची खिल्ली उडवली आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची कोंडी केली.
मनोज जरंगे म्हणाले :
मराठ्यांच्या आरक्षणाला कुठही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही. आमचं आरक्षण हक्काच आहे. बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नये, एवढी आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. मराठ्यांच आणि मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ होईल असं एकही पाऊल आपण जातीयवादी नेत्यांचं ऐकून उचलू नये.
विजय वडेट्टीवार म्हणतायत, मराठा आरक्षणासाठी जो जीआर केलाय तो रद्द करण्याची आमची मागणी आहे. त्याचं कोण ऐकतय बुगळ्याच त्या. दिल्लीत गांधी लाल्याने सांगितलं असेल, मराठ्यांच्या विरोधात बोल म्हणून. म्हणून काँग्रेस मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलतेय.
ओबीसींचा नेता कोणी नाही. ते जास्त बोलतात म्हणून मुख्यमंत्र्यांनी बोलवून घेतलं. मुख्यमंत्र्यांना यांची औकात कळली आहे. हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाही, हे देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलय. त्यामुळे बापाची पेंड आहे का? जीआर रद्द करणं. हैदराबाद गॅझेटच्या आधारे जीआर काढलाय. आमची पण मागणी आहे, 1994 चा जीआर रद्द करा. वरच 2 टक्के आरक्षण ते पण रद्द करा. काहींनी असं सांगितलं की, आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो. म्हणून बंजारा समाजाच आरक्षण घेतलं, ते बंजारा समाजासारखे दिसत नाहीत. त्यांना बाहेर काढा. यापुढे जशाला तशी फाईट होणार.
ओबीसीत 400-500 जाती आहेत. छगन भुजबळ थोड्या माळ्यांचा नेता आहे, सगळ्या माळ्यांचा नाही. हे जातीचे नेते आहेत, यात ओबीसींचा संबंध नाही. गरज नाही याच्या मागेमागे पळायची. मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगणं आहे की, मराठ्यांच्या आरक्षणाच्या जीआरचा अवमान होईल, असे त्यांचे ऐकून पाऊल उचलायच नाही. ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. त्याचं ऐकून आमची प्रमाणपत्र थांबवू नका. दिवाळीच्याआधी हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा. अन्यथा पुन्हा सरकारसाठी आंदोलनाचा वाईट दिवस येईल. तुम्ही मजा बघत असाल, आज करू, उद्या करू. तर फडणवीस आणि विखे तुमच्या नरड्यावर येईन, पळायलाही जागा उरणार नाही.
Manoj Jarange mocks Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Israel : इस्रायलने गाझाकडे जाणारे 13 जहाज रोखले:ग्रेटा थनबर्गसह 150 जणांना अटक; 30 मदत जहाजे अजूनही मार्गावर
- सायबर फसवणुकीविरुद्ध राज्याची सज्जता : जागतिक दर्जाची लॅब्स, त्वरित प्रतिसाद आणि व्यापक जनजागृती
- President Putin : रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले – भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, मी मोदींना ओळखतो, भारतीय अपमान सहन करत नाहीत
- Arun Lad : पुणे पदवीधर मतदारसंघात राजकीय खेळी ; शरद लाड यांचा भाजप प्रवेश ?