वृत्तसंस्था
चंदीगड : हरियाणात अत्यंत वेगवान राजकीय घडामोडी घडत असून मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला आहे. हरियाणात दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपी पार्टीशी भाजपचे संबंध खराब झाल्याची बातमी असून ती आघाडी तुटण्याच्या बेतात आहे. त्याच वेळी मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन ते लोकसभेच्या मैदानात उतरण्याची ही बातमी समोर आली आहे. Manohar Lal Khattar resigns as CM of Haryana; outside visuals from Raj Bhavan in Chandigarh
मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाची कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली होती. त्यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांबाबतच्या आठवणी शेअर केल्या होत्या. भाजप संघटनेत काम करताना मनोहर लाल खट्टर आणि आपण एकाच मोटरसायकल वरून कसा प्रवास करत होतो, त्यावेळी हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब मधले रस्ते किती खराब होते, परंतु आता ते रस्ते चांगले झाले असल्याचे वर्णन नरेंद्र मोदी यांनी केले होते.
आता मनोहर लाल कट्टर यांनी राजीनामा दिल्यानंतर हरियाणामध्ये मुख्यमंत्री पदाच्या निवडीच्या राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची माळ हरियाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष नायब सिंह सैनी यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
Manohar Lal Khattar resigns as CM of Haryana; outside visuals from Raj Bhavan in Chandigarh
महत्वाच्या बातम्या
- भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात वॉरंट; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणीत गैरहजर
- सुप्रीम कोर्टाचा एसबीआयला आज इलेक्टोरल बाँड डेटा देण्याचे आदेश, EC ने 15 मार्चपर्यंत वेबसाइटवर टाकावा
- कृषि पणन व्यवस्थेबाबत अमुलाग्र बदलांच्या दांगट समितीच्या शिफारशी!!
- CAA ची घालून “भीती” विखुरलेल्या INDI आघाडीला एकजुटीची संधी!!