• Download App
    Manmohan Singh राहुल गांधी म्हणाले, मी गुरु आणि मार्गदर्शन गमावले; पण...!!

    राहुल गांधी म्हणाले, मी गुरु आणि मार्गदर्शन गमावले; पण…!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Manmohan Singh  भारताच्या आर्थिक सुधारणा धोरणाचे अध्वर्यु माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या श्रद्धांजलीतून राहुल गांधी प्रगल्भतेकडे गेलेले नेते दिसले. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने मी गुरु आणि मार्गदर्शक गमावला, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर मनमोहन सिंग यांच्याबरोबरचे अनेक फोटो शेअर करून त्यांच्या कामगिरीविषयी गौरवोद्गार लिहिले. लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्याने माजी पंतप्रधान कालवश झाल्यानंतर अशी पोस्ट लिहिणे ही समायोचित बाब ठरली. Manmohan Singh

    अर्थात राहुल गांधींनी आज जरी समायोचित पोस्ट लिहिली असली, तरी राहुलनी मनमोहन सिंग यांचा गुरु म्हणून दिलेला सल्ला आणि मार्गदर्शन नेहमीच स्वीकारले, असे घडले नव्हते. किंबहुना त्यांच्या सरकारचा अध्यादेश भर पत्रकार परिषदेत पाडून राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांचा अपमान देखील केला होता. Manmohan Singh

    राहुल गांधींनी आपल्या मंत्रिमंडळात मंत्रिपद स्वीकारून प्रशासकीय अनुभव घ्यावा, अशी सूचना मनमोहन सिंग यांनी केली होती. त्यामुळे राहुल गांधींना प्रशासनाची सर्व अंगे नीट माहिती होतील. त्याचबरोबर प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या समस्या आणि अडथळे यांची देखील जाणीव होईल, असा या सूचनेमागचा मूळ हेतू होता. परंतु, राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री म्हणून काम करणे पसंत केले नव्हते. ते मंत्रिमंडळ बाहेर राहूनच सरकारला “पॉलिटिकली डॉमिनेट” करत राहिले होते.

    सावरकरांच्या अपमानाच्या मुद्द्यावर मनमोहन सिंग यांनी अतिशय समंजस भूमिका घेतली होती. सावरकरांना काँग्रेस देशभक्त मानते. इंदिरा गांधींनी सावरकरांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढले होते. परंतु, सावरकरांच्या हिंदुत्वाच्या राजकीय विचार प्रणाली विषयी त्यांच्याशी आमचे मतभेद आहेत, असे मनमोहन सिंग यांनी स्पष्ट केले होते. यातून त्यांनी काँग्रेसला एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा आदर कसा करावा, त्याचे योगदान कसे मान्य करावे, पण त्याचवेळी राजकीय मतभेद असतील तर ते सभ्य भाषेत कसे व्यक्त करावेत, याचा वस्तूपाठ घालून दिला होता. पण राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांचा तो सल्ला आणि मार्गदर्शन देखील स्वीकारले नाही. ते सावरकरांचा अपमान करतच राहिले.

    त्यामुळे आज जरी राहुल गांधींनी मनमोहन सिंग यांच्या जाण्याने आपण गुरु आणि मार्गदर्शक गमावला, असे लिहिले असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्या मंत्रिमंडळात जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे त्यांनी टाळले होते, ही वस्तुस्थिती विसरता येणार नाही.

    Manmohan Singh Ji led India with immense wisdom and integrity

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’