• Download App
    मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ|Manish Sisodias judicial custody extended till May 7

    मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ

    यापूर्वी सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २६ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पार्टीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना बुधवारी मोठा धक्का बसला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत ७ मे पर्यंत वाढ केली आहे. यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयाने सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत २६ एप्रिलपर्यंत वाढ केली होती.Manish Sisodias judicial custody extended till May 7



    यासोबतच या प्रकरणातील जबाब आणि पुरावे दाखवण्यासाठी एक टेबल तयार करण्याचे निर्देशही न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात होणार आहे.

    दिल्ली दारू धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात सध्या आरोप निश्चित करू नयेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर राऊस अव्हेन्यू कोर्टाने केंद्रीय तपास यंत्रणेकडून उत्तर मागितले आहे.

    आरोपीच्या वकिलाने सुनावणीदरम्यान न्यायाधीशांना सांगितले की, आम्ही कोर्ट रूममधून बाहेर पडायला नको होते. याबद्दल आम्ही माफीही मागतो. यावर नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती म्हणाले की, अशा प्रकारची वागणूक आपण प्रथमच पाहिली आहे. तुमचा युक्तिवाद पूर्ण होताच तुम्ही कोर्टातून बाहेर पडलात. दरम्यान, याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की अद्याप तपास सुरू आहे. तर सीबीआयने या युक्तिवादाला विरोध केला.

    Manish Sisodias judicial custody extended till May 7

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक