विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने आज सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही प्रकरणांमध्ये जामीन मिळावा यासाठी सिसोदिया यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.Manish Sisodia will remain under investigation in Delhi liquor policy scam case
सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधीही कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.
जामिनाला विरोध करताना तपास यंत्रणेने म्हटले होते की, सिसोदिया हे घोटाळ्याचे किंगपिन आहेत, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, जर त्यांना जामीन दिला गेला तर सिसोदिया पुराव्याशी छेडछाड करू शकतात. साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात. दुसरीकडे, मनीष सिसोदिया यांचा राऊस एव्हेन्यू कोर्टातून जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता मनीष सिसोदिया हायकोर्टात जाणार असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसांपूर्वी राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला होता आणि आज ही याचिका फेटाळली आहे. मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर सीबीआयने न्यायालयात युक्तिवाद केला होता की, ते किंगपिन असल्याचे आम्ही वारंवार सांगितले आहे आणि त्यांच्या याचिकेला विलंब होण्याचे कारण आहे. आम्ही विलंबाच्या कारणांबद्दल सांगितले आहे की न्यायालयाने देखील आपल्या आधीच्या आदेशात सिसोदिया हे मास्टरमाइंड असल्याचे मान्य केले आहे. गेल्या सुनावणीदरम्यान सिसोदिया यांच्या वतीने युक्तिवाद यापूर्वीच करण्यात आला असल्याने, राऊस एव्हेन्यू कोर्टाने सिसोदिया यांच्याविरुद्ध ईडी आणि सीबीआयमध्ये नोंदवलेल्या खटल्यावरील निर्णय राखून ठेवला होता आणि आज ही याचिका फेटाळण्यात आली.
Manish Sisodia will remain under investigation in Delhi liquor policy scam case
महत्वाच्या बातम्या
- “भटकता आत्मा” हे महाराष्ट्रापुरते का होईना, पण “पप्पू” सारखेच मोठे प्रतिमा भंजन!!
- मणिपूरच्या पश्चिम इंफाळमध्ये गोळीबार; 12 जणांनी केली शूटिंग, मोर्टार डागले
- भटकता आत्मा आणि महाराष्ट्रातील अस्थिरता यांचा संबंध जोडून मोदींनी विधानसभा निवडणुकीचाही टोन केला सेट!!
- भटकत्या आत्म्याने महाराष्ट्र अस्थिर केला आता देश अस्थिर करायला निघालाय; पुण्यातून मोदींचा शरद पवारांवर जबरदस्त प्रहार!!