- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करून दिली माहिती.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: उत्तर-पूर्वेतील प्रतिबंधित संघटना युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने केंद्र आणि राज्य सरकारांशी दीर्घ चर्चेनंतर अखेर शांतता करारावर स्वाक्षरी केली. मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू होते.Manipurs banned organization UNLF abandons its path of violence Signed a peace agreement with the center
राज्य आणि केंद्र सरकार विविध प्रयत्न करत होते. बुधवारी सरकारला याबाबत मोठे यश मिळाले. मणिपूरच्या सर्वात जुन्या बंडखोर गटाने कायमस्वरूपी शांतता करार मंजूर केला. या गटाशी सरकार अनेक दिवस चर्चेत गुंतले होते. युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने बुधवारी कायमस्वरूपी शांतता करारावर स्वाक्षरी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, ”एक ऐतिहासिक टप्पा गाठला!!! युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने आज शांतता करारावर स्वाक्षरी केल्यामुळे ईशान्येत चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांनी पूर्णतेचा एक नवीन अध्याय जोडला आहे.”
तसेच ”UNLF, मणिपूरचा सर्वात जुना सशस्त्र गट, हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्यास सहमत आहे. मी लोकशाही प्रक्रियेचे स्वागत करतो आणि त्यांना शांतता आणि प्रगतीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.” असंही शाह म्हणाले.
Manipurs banned organization UNLF abandons its path of violence Signed a peace agreement with the center
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारचे सर्वात मोठे यश; मणिपूरच्या सर्वात जुन्या बंडखोर गटाने शस्त्रे सोडली, केंद्राशी केला शांतता करार
- सारा तेंडुलकरची यशस्वी कामगिरी!
- मणिपूरमधील मैतेई उग्रवादी संघटनांवर अंकुश ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाकडून न्यायाधिकरणाची स्थापना!
- प्रकाश आंबेडकर – रोहित पवारांची “अदृश्य शक्तीची” एकच भाषा; फडणवीसांवरच वेचक – वेधक निशाणा!!