• Download App
    Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार; गोळीबारात ९ जण ठार, अनेक जखमी Manipur Violence Violence erupted again in Manipur 9 killed in firing many injured

    Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार; गोळीबारात ९ जण ठार, अनेक जखमी

    शांततेच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे

    विशेष प्रतिनिधी

    इंफाळ : हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये शांततेच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खमेनलोक भागात झालेल्या हिंसाचारात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या हिंसाचारात अनेक जण जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. Manipur Violence Violence erupted again in Manipur 9 killed in firing many injured

    इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मंगळवारी (13 जून) दहशतवाद्यांनी केलेल्या अचानक गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले. यादरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरांना समाजकंटकांनी आग लावल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंगमध्येही अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

    इंफाळ पूर्वेचे पोलिस आयुक्त शिवकांत सिंह यांनी सांगितले की, खामेनलोक भागात उसळलेल्या हिंसाचारात नऊ जण ठार आणि दहाजण जखमी झाले. मृतांच्या शवविच्छेदनाची कारवाई करण्यात येत आहे. त्याचवेळी, एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. अनेक जखमींना उपचारासाठी इंफाळला नेण्यात आले आहे.

    हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या अनेकांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आणि गोळ्यांच्या जखमा आढळून आल्या आहेत. मणिपूरमधील हिंसाचारामुळे राज्यातील शांतता प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये गेल्या महिनाभराहून अधिक काळ शांततेसाठी प्रयत्न सुरू आहेत. आरक्षणावरून मेईतेई आणि कुकी समाजामध्ये संघर्ष झाला होता. ही घटना अशा वेळी घडली जेव्हा एक दिवस आधी संचारबंदी शिथिल करण्यात आली होती. खामेनलोक परिसरात गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते.

    Manipur Violence Violence erupted again in Manipur 9 killed in firing many injured

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    लाल्या म्हणून मनोज जरांगे यांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली; मराठा आरक्षणावरून काँग्रेसची केली कोंडी!!

    Air Force chief : हवाई दल प्रमुख म्हणाले – भारतीय विमान पाडल्याचे दावे केवळ कथा; पाकिस्तानकडे पुरावे असतील तर दाखवावेत

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- पाकिस्तानला भूगोलावरून पुसून टाकू, सैनिकांना सांगितले – तयार राहा, देवाची इच्छा असेल तर लवकरच संधी मिळेल