विशेष प्रतिनिधी
इंफाळ : मणिपूरमधला हिंसाचार थांबण्याचे नावच घेत नाहीये. मणिपूरमध्ये हिंसक जमावाने आता थेट केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांनाच टार्गेट करून त्यांच्या घरालाच आग लावली. मंत्र्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकून त्यांचे घर जाळले. मात्र, सिंह हे घरी नव्हते, त्यामुळे ते थोडक्यात बचावले.Manipur violence: Mob torches Union minister Rajkumar Ranjan Singh’s house in Imphal
धक्कादायक बाब म्हणजे इंफाळमध्ये संचारबंदी लागू असतानाही जमावाने संचारबंदी झुगारून केंद्रीय मंत्र्याच्या घरावर धडक दिली. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त असतानाही जमावाने मंत्र्याचं घर पेटवून दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भाजप हादरला. आहे.
मैतेई आणि कुकी समुदायात गेल्या दोन महिन्यापासून तणाव सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मणिपूरला आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील हिंसेचा आढावा घेतला होता. अधिकारी आणि काही प्रतिष्ठीत लोकांशी त्यांनी संवाद साधला होता. त्यानंतर त्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं. कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात हिंसा भडकल्याचं त्यांनी म्हटलं होतं. राज्यातील हिंसाचार पाहता स्थानिक आमदारांनी आपल्या घराबाहेर एक बॉक्स ठेवला आहे. लुटमार करून आणलेली आणि हिसकावून आणलेली हत्यारे या बॉक्समध्ये टाका, असं या बॉक्सवर लिहिण्यात आलं आहे. नागरिकांनी हिंसा करू नये म्हणून आमदारांनी ही शक्कल लढवली आहे.
केरळला होते म्हणून…
केंद्रीय मंत्री राजकुमार सिंह यांच्या इंफाळ येथील घरावर काल रात्री अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला. पेट्रोल बॉम्ब फेकताच आगीने पेट घेतला आणि घरभर आग पसरली. घराला आग लागताच घरातील लोक तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, मोठी वित्तहानी झाली आहे. मंत्री राजकुमार सिंह हे केरळ दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या हल्ल्यातून ते बचावले.
माझ्या राज्यात जे काही होतंय ते पाहून मला दु:ख झालं आहे. आता सर्वांनी शांतता राखावी असं माझं आवाहन आहे. असा प्रकारच्या हिंसेत जे लोक सहभागी झाले आहेत, ते अमानवी आहे, असे सिंह यांनी सांगितले.
मी एका कामानिमित्ताने केरळला आलेलो आहे. काल रात्री इंफाळ येथील माझं घर पेटवून दिले. सुदैवाने त्यात कोणताही जीवित हानी झाली नाही. हिंसक लोक पेट्रोल बॉम्ब घेऊन आले होते. त्यांनी घरावर पेट्रोल बॉम्ब टाकले. त्यामुळे लागलेल्या आगीत माझ्या घराच्या तळ मजला आणि पहिल्या मजल्यावर मोठं नुकसान झाले.
Manipur violence: Mob torches Union minister Rajkumar Ranjan Singh’s house in Imphal
महत्वाच्या बातम्या
- पीएम मोदींसाठी डिनर होस्ट करणार बायडेन फॅमिली; पंतप्रधान 21 जून रोजी बायडेन-जिल यांचे पाहुणे असतील, दुसऱ्या दिवशी स्टेट डिनर
- अंतराळातून कसे दिसले बिपरजॉय चक्रीवादळ? सौदीच्या अंतराळवीराने टिपली भयंकर दृश्ये
- उत्तर प्रदेश : दारुल उलूम देवबंदने विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकण्यावर घातली बंदी!
- अहमदाबादमध्ये लँडिंग दरम्यान इंडिगो फ्लाइटला ‘टेल स्ट्राइक’चा फटका