ट्विटर हँडल वरून भावनिक व्हिडिओ शेअर करत केली विनंती.
विशेष प्रतिनिधी
पुणे : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपूर राज्यात दोन समुदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे . Manipur violence. Mirabai Chanu request to PM Modi to stop the violence in Manipur.
गेली तीनं महिने हे राज्य आणि या राज्यातील सर्वसामान्य लोक अनेक आव्हानांचा सामना करतायेत. या सगळ्या प्रकारामध्ये आतापर्यंत 140 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे . मात्र अध्याप कुठेही या वर कारवाई हॊताना दिसत नाहीय.
या सगळ्यावर भाष्य करण्यासाठी ऑलम्पिक पदक विजेती वेटलिफ्टर मिरा बाई चानू आता समोर आलीय. गेल्या अनेक दिवसा पासून सुरु असलेला हा हिंसाचार थांबवावा आणि मणिपूर मध्ये शांतता प्रस्थापित करावी यासाठी मीराबाईने आपल्या ट्विटर हँडल च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विनंती केली आहे . या व्हिडिओच्या माध्यमातून मीराबाईने त्यांना भावनिक आवाहन केलंय.
अशा परिस्थितीत मणिपूर मधील खेळाडूंना प्रशिक्षण देता येत नाही. विद्यार्थ्यांनाही अभ्यासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी देखील अनेक समस्या जाणवत आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं आणि खेळाडूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय. त्यामुळे हा हिंसाचार थांबवावा असं भावनिक आवाहन मिरा बाई ने केलं आहे.
Manipur violence. Mirabai Chanu request to PM Modi to stop the violence in Manipur.
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित; भाजप आणि जेडीएसने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला
- द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर
- ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली ‘त्या’ रहस्यमयी वस्तूबाबत ‘ISRO’ प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान, म्हणाले…
- व्हिडिओ कांडात अडकलेल्या किरीट सोमय्यांच्या मदतीला आले जितेंद्र आव्हाड!!