मैतेई समुदायाच्या 9 संघटनांना अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने मैतेई समुदायाच्या 9 संघटनांना अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. तसेच संघटनांवर काही वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.Manipur Violence Big decision of Ministry of Home Affairs ban on 9 organizations of Maitei community
गृह मंत्रालयाने आज पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) आणि त्याची राजकीय शाखा, रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट (RPF), युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) आणि त्याची सशस्त्र शाखा, मणिपूर पीपल्स आर्मी (MPA) यांना अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले. या संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
कोणत्या संघटनांवर बंदी घालण्यात आली? –
- पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)
- रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट (RPF)
- युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF)
- मणिपूर पीपल्स आर्मी (MPA)
- पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलीपाक (PREPAK)
- रेड आर्मी, कांगलीपक कम्युनिस्ट पार्टी (KCP)
- कांगली याओल कानबा लूप (KYKL)
- समन्वय समिती (CORCOM)
- अलायन्स फॉर सोशालिस्ट युनिटी कांगलीपक (ASUK)
काही दिवसांपूर्वीच मणिपूर सरकारने मोबाईल इंटरनेटवरील बंदी वाढवण्याची घोषणा केली होती. राज्य सरकारने मोबाईल इंटरनेटवरील बंदी आज 13 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. जातीय संघर्षाचा प्रभाव नसलेल्या चार पहाडी जिल्हा मुख्यालयात ही बंदी लागू केली जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
Manipur Violence Big decision of Ministry of Home Affairs ban on 9 organizations of Maitei community
महत्वाच्या बातम्या
- Mission Mahagram : ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन आणि IDBI बँक यांच्यात सामंजस्य करार!
- ज्येष्ठ नागरिकांच्या दिवाळी आनंदात भर; नवी मुंबईत मोफत बस प्रवास!!
- पुढील आठवड्यात उत्तराखंडमध्ये UCC लागू होणार?, विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची तयारी सुरू
- मथुरा पोलिसांनी ५० हजार रुपयांचा इनाम असलेल्या आरोपीला केले ठार