• Download App
    मणिपूर : निरंजॉय सिंगच्या एका मिनिटात 109 पुशअप , बनवला नवा गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड। Manipur: Niranjoy Singh's 109 pushups in one minute, set new Guinness World Record

    मणिपूर : निरंजॉय सिंगच्या एका मिनिटात 109 पुशअप , बनवला नवा गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड

    निरंजॉयच्या नव्या विक्रमाची पडताळणी करण्यासाठी पुशअप्सचा व्हिडीओ लंडनच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. Manipur: Niranjoy Singh’s 109 pushups in one minute, set new Guinness World Record


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ब्रिटनच्या ग्रॅहम माली याने 13 वर्षांपूर्वी सर्वाधिक पुशअप्सचा रेकॉर्ड केला होता तो निरंजॉय सिंगने मोडला आहे.मणिपूरमधील 24 वर्षीय युवक थौनाओजम निरंजॉय सिंग याने एका मिनिटात एका मिनिटात 109 पुशअप करून सर्वाधिक पुशअप (फिंगर टिप्स) करण्याचा नवा गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड बनवला आहे. निरंजॉय सिंगने एका मिनिटात 109 पुशअप करून 105 पुशअपचा जुना विक्रम मोडला.

    एज्टेक स्पोर्टस् मणिपूर या संस्थेद्वारे एज्टेक फाईट स्टुडिओमध्ये या विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निरंजॉयच्या नव्या विक्रमाची पडताळणी करण्यासाठी पुशअप्सचा व्हिडीओ लंडनच्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे.



    दरम्यान केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी ट्विट करत निरंजॉयचे अभिनंदन केले आहे. एका मिनिटात विश्वविक्रम करणाऱया निरंजॉयची अविस्मरणीय शक्ती बघून आश्चर्यचकीत व्हायला होतं. त्याच्या यशाबद्दल अभिमान वाटत आहे, असं ट्विट रिजीजू यांनी केले आहे.

    निरंजॉय हा इंफाळच्या पश्चिमेला असणाऱया नारन कोंजिन ममंग लीकाई भागात राहतो. निरंजॉयच्या वडिलांचे नाव थौनाओजम राजेन सिंह आहे. दरम्यान 2019 मध्ये निरंजॉयने एका मिनिटात सर्वाधिक आर्म लेग पुशअपचा विश्वविक्रम तोडला होता. त्यानंतर निरंजॉयने 2020 साली त्याने एका मिनिटात सर्वाधिक हॅण्ड नकल पुशअप्सचा रेकॉर्ड केला होता.

    Manipur: Niranjoy Singh’s 109 pushups in one minute, set new Guinness World Record

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य