विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार या विषयावर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू असताना तिकडे पूर्वोत्तर राज्य मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नियोजनपूर्वक तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे मणिपूर राजकीय तोडग्याच्या दिशेने निघाल्याचे स्पष्ट झाले.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतली त्यानंतर ते खासदार संबित पात्रा यांच्यासह मणिपूरची राजधानी इम्फाळ येथे पोहोचले. त्यांनी राजभवन मध्ये जाऊन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाची चर्चा सुरू असताना दिल्लीत बीरेन सिंह आले. ते अमित शाह यांना भेटले. त्यानंतर ते मणिपूरला परतले या सगळ्या बातम्यांची साधी भनक देखील माध्यमांना लागली नाही. माध्यमे फक्त दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या नावांच्या अटकळी बांधत राहिली. पण दरम्यानच्या काळात बीरेन सिंह राजधानीत येऊन परत इम्फाळला जाऊन राजीनामा देऊन मोकळे झाले.
मणिपूर मध्ये माजी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची राज्यपाल पदी नियुक्ती केल्यानंतर तिथे ड्रग्स माफिया, घुसखोर आणि दोन समाजांमध्ये भांडणे लावणारे समाजकंटक यांच्या विरोधात सरकारने कारवाईचा बडगा उगारला. कायद्याची कठोर अंमलबजावणी करून अनेकांच्या मुसक्या आवळल्या. धगधगत्या मणिपूरला शांत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मैतेई आणि कुकी समाजात शांतता प्रस्थापित केली. परंतु केवळ कायद्याचा बडगा चालवून टिकाऊ शांतता निर्माण होणार नाही हे लक्षात घेऊन मणिपूर मध्ये राजकीय तोडगा काढण्याची गरज लक्षात येताच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांना राजीनामा द्यायला लावला. त्यामुळे मणिपूरमध्ये राजकीय तोडगा काढण्याचा मार्ग मोकळा झाला. राज्यात आता राष्ट्रपती राजवट लावून सर्वपक्षीय बैठक घेऊन त्याचबरोबर समाजातल्या सर्व घटकांशी संवाद साधून राजकीय तोडगा काढण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येतील.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना एन. बीरेन सिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात तशाच स्वरूपाची अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी ड्रग्स माफिया आणि घुसखोर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
Manipur CM N Biren Singh hands over the letter of resignation from the post of Chief Minister to Governor Ajay Kumar Bhalla at the Raj Bhavan
महत्वाच्या बातम्या
- US H-1B visa : अमेरिकेच्या H-1B व्हिसासाठी अर्ज करण्याची तारीख जाहीर
- Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल अन् संजय सिंह यांची चौकशी करण्यासाठी ACBचे पथक रवाना
- S. Jaishankar: अमेरिकेने १५ वर्षांत किती भारतीयांना मायदेशी पाठवले?
- फडणवीसांनी राहुल गांधींवर केला कव्हर फायरिंगचा आरोप; पण मग केजरीवालांनी काय केलं??