विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारताच्या फाळणीचे दु:खद स्मृतिस्थळ असलेल्या मुंबईतील जिना हाऊसचे अधिग्रहण करून त्यामध्ये प्रस्तावित साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल सेंटर स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.Mangalprabhat Lodha demands to set up an art and cultural center by acquiring Gina House, a sad memorial to the partition of India
गृहमंत्री अमित शाह यांना सादर केलेल्या निवेदनात मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे की, आपल्या गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळात भारत प्राचीन वैभव प्राप्त करत आहे. त्याचा भारतीय नागरिकांनाही अभिमान वाटत आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणे असो किंवा नागरिकता संशोधन कायद्याद्वारे परदेशातील पीडित अल्पसंख्यांकांना संरक्षण देण्याचा मुद्दा असो, हा केवळ आपला दृढ निश्चिय आणि राष्ट्र हिताला सवोर्तोपरी मानण्याचा परिणाम आहे.
याच पार्श्वभूमीवर आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छित आहे की, माझे विधानसभा क्षेत्र मलबार हिल (मुंबई) मधील भारताच्या फाळणीची आठवण करून देणारे जिना हाऊस उजाड अवस्थेत पडून आहे.
स्वातंत्र्या अगोदर याच जिना हाऊसमध्ये बसून मोहम्मद अली जिना यांनी जवळपास एक दशकापर्यंत भारताचे तीन तुकडे करण्याचे षडयंत्र रचले व शेवटी यामध्ये ते यशस्वी झाले. जिना हाऊस भारताच्या फाळणीचे दु:खद स्मृतिस्थळ आहे.
भारत सरकारने २०१७ मध्ये ४९ वर्षे जुन्या शत्रु संपत्ती अधिनियमात संशोधन करून, हे सुनिश्चित केले आहे की, विभाजनावेळी पाकिस्तानमध्ये जाऊन स्थायिक झालेल्या लोकांच्या संपत्तीवर त्यांच्या वारसांचा किंवा नातलगांचा कोणताही हक्क नसून, त्यावर भारत सरकारचा हक्क आहे. सरकार आता अशा ९ हजार २८० संपत्तींचा लिलाव करणार आहे.
तर, जिना हाऊसला साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अॅण्ड कल्चर सेंटर घोषित करून सरकारची त्यामध्ये सांस्कृतिक कामकाज सुरू करण्याची योजना होती, ज्याबाबत जिना हाऊसच्या मुख्य दरवाज्यावर एक फलक देखील लावलेला आहे, असे लोढा यांनी म्हटले आहे.
आपल्याला विनंती आहे की राष्ट्रवादाच्या अस्मितेशी जुडलेल्या या भावनेला पाहून भारताच्या फाळणीचे दु:खद स्मृतिस्थळ जिना हाऊसचे अधिग्रहण करून त्यामध्ये प्रस्तावित साउथ एशिया सेंटर फॉर आर्ट अॅण्ड कल्चरल सेंटर स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करावी.ह्व असंही मगंलप्रभात लोढा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
Mangalprabhat Lodha demands to set up an art and cultural center by acquiring Gina House, a sad memorial to the partition of India
महत्त्वाच्या बातम्या
- ड्रोन उड्डाणांवर वेस्टर्न नेव्ही कमांडची कठोर भूमिका, 3 किमी रेंजमध्ये आलेले ड्रोन होणार नष्ट
- Corona Cases in india : देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, 24 तासांत 40 हजारांहून जास्त नवे रुग्ण, 4 हजार रुग्णांचा मृत्यू
- Eid-ul-Adha : राष्ट्रपती – पंतप्रधानांनी दिल्या ईद-उल-अधाच्या शुभेच्छा, सद्भाव, प्रेम आणि त्यागाची केली कामना
- pegasus Controversy : संसदेच्या बाहेरही सरकारला घेरणार काँग्रेस, वेगवेगळ्या राज्यांत घेणार पत्रकार परिषदा