• Download App
    पंतप्रधानांनी संवाद साधल्यावर स्वत: तर कोरोना लस घेतलीच आणि गावातील सर्वांनाही घ्यायला लावली|Man Ki Bat effect,he took the corona vaccine himself and made everyone in the village take it

    पंतप्रधानांनी संवाद साधल्यावर स्वत: तर कोरोना लस घेतलीच आणि गावातील सर्वांनाही घ्यायला लावली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवादामुळे प्रेरित होऊन मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील दुलारिया येथील एका ग्रामस्थाने स्वत: तर लस घेतलीच पण गावातील सर्वांना लस घेण्यासाठी प्रेरित केले.Man Ki Bat effect,he took the corona vaccine himself and made everyone in the village take it


    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवादामुळे प्रेरित होऊन मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यातील दुलारिया येथील एका ग्रामस्थाने स्वत: तर लस घेतलीच पण गावातील सर्वांना लस घेण्यासाठी प्रेरित केले.
    पंतप्रधान मोदीयांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात दुलारिया येथील राजेश हिरवे यांच्याशी संवाद साधला.

    कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत नागरिकांत असलेला संभ्रम पंतप्रधानांनी दूर केला.हिरवे म्हणाले, पंतप्रधानांनी माझ्याशी शुक्रवारी संवाद साधला होता. त्यानंतर मी माझ्या संपूर्ण कुटुंबासमवेत जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले. पंतप्रधानांनी लसीकरणाचे महत्व सांगितल्यावर मी गावातील लोकांनाही लसी घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.



    त्यामुळे गावातील १२७ लोकांनी लसीकरण करून घेतले. आता गावातील सर्वांनाच आपण कोरोना लस घेण्यासाठी प्रेरित करणार आहे. पंतप्रधानांनी संवाद साधल्यानंतर मला झालेला आनंद शब्दांत वर्णन करता येणार नाही.

    हिरवे यांनी पंतप्रधानांशी बोलताना सांगितले की लोकांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. व्हॉटसअ‍ॅपवर याबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत.पंतप्रधानांनी येथीलच किशोरीलाल धुर्वे या साठ वर्षीय नागरिकाशीही संवाद साधला. त्यांनीही लसीकरण करून घेतले आहे

    किशोरीलाल यांचे चिरंजीव रविंद्र म्हणाले,पतंप्रधानांशी बोलल्यावर वडलांनी लगेचच लसीकरण करून घेतले आहे.हिरवे आणि धुर्वे यांच्याशी बोलताना पंतप्रधान म्हणाले त्यांनी स्वत: आणि त्यांच्या १०० वर्षीय आईनेही कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यामुळे लसीकरणाबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका . विज्ञान आणि आपल्या शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवा. कोरोनाचा धोका अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे लसीकरण करून घेणे आणि कोरोना नियमावलींचे पालन करणेच त्यावर उपाय आहे.

    Man Ki Bat effect,he took the corona vaccine himself and made everyone in the village take it

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Anil Chauhan : CDS म्हणाले- ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही पाकिस्तानला हरवले; सैन्य ही अशी जागा, जिथे घराणेशाही नाही

    Delhi High Court : कुटुंबाशी संबंध तोडण्याचा पतीवर दबाव हे मानसिक क्रौर्य; दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही