प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या 30 ऑक्टोबर 2022 च्या मन की बात मध्ये भारतीय धार्मिक मनाला वेगळा आयाम दिला. पंतप्रधान मोदींनी देशात होत असलेल्या छटपूजेचा संबंध पारंपारिक सूर्य उपासनेबरोबर सौर ऊर्जेच्या वापराशी आणि स्वयंपूर्ण देशी उर्जेशी देखील जोडला.Man Ki Baat : PM Modi links traditional Chhat Puja with Surya Upasana + Solar Energy!!
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले भारतीय परंपरेत छटपूजेला म्हणजेच सूर्यपुजेला फार महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या सार्वजनिक छटपूजेचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. ठिकठिकाणी राज्याराज्यांमध्ये सार्वजनिक छटपूजा करून सूर्य उपासनेचे वेगवेगळे आयाम आपल्याला दिसून येतात. इतकेच नाही तर प्रदेशांमधून देखील मोठ्या प्रमाणावर छटपूजा केली जात असल्याचे दिसते. आता आपण याला नवीन आयाम जोडला पाहिजे आणि तो आयाम सौर ऊर्जेचा असला पाहिजे.
सौरऊर्जा आपल्या भारतीयांच्या जीवनातला जीवनशैलीचा भाग आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि स्वस्त मिळवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गुजरात मधल्या मोढेरासारखे संपूर्ण गावच सौरऊर्जेने व्याप्त आहे. मोढेरा गावाने सौर ऊर्जेच्या वापर वाढवून उर्जा स्वयंपूर्णता मिळवली आहे. अशा अनेक गावांनी पंतप्रधान कार्यालयाकडे सौर ऊर्जेने व्याप्त होण्याच्या मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकार त्यांचा नक्की सकारात्मक विचार करेल. सौरऊर्जेसंबंधी जितकी जनजागृती होईल तितकी स्वच्छ ऊर्जा स्वस्त ऊर्जा या दृष्टीने आपल्याला पावले उचलता येतील आणि अंतिमतः देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल, याची आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या या मन की बात मधून भारतीय परंपरेचा आधुनिक आयाम दिसून आला आहे परंपरा जपली पाहिजेच पण त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन जीवनशैलीचा भाग बनविणे महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले आहे.
Man Ki Baat : PM Modi links traditional Chhat Puja with Surya Upasana + Solar Energy!!
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची नाही गरज; घ्या डिजिटल तिकीटे
- बेस्ट, सिटी बसप्रमाणे एसटीचे ही कळणार लाईव्ह लोकेशन; लवकरच अॅपमध्येही सुविधा
- महाराष्ट्रात सायबर इंटेलिजन्स युनिट उभारणार; सुरजकुंडच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांची माहिती
- राजस्थानात घृणास्पद प्रकार; भीलवाडा शहरात स्टॅम्प पेपरवर मुलींची विक्री