• Download App
    ४३ वर्षांपूर्वी खरेदी केले ३,५०० शेअर्स आणि तो विसरला; आता त्याचे मूल्य झाले १४४८ कोटी |Man Bought 3,500 Shares 43 Years Ago & Forgot About It, Now Its Value Is Rs 1448 Crore

    ४३ वर्षांपूर्वी खरेदी केले ३,५०० शेअर्स आणि तो विसरला; आता त्याचे मूल्य झाले १४४८ कोटी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: आयुष्यात अशा काही घटना घडतात की माणसाचे जीवन एका क्षणात बदलते. एका व्यक्तीने ३,५०० शेअर्स खरेदी केले होते आणि तो एका रात्रीत करोडपती सुद्धा झाला. परंतु तो रक्कमेपासून वंचित आहे.Man Bought 3,500 Shares 43 Years Ago & Forgot About It, Now Its Value Is Rs 1448 Crore

    वाचून आश्चर्य वाटले ना ! पण ही घटना सत्य आहे. हे प्रकरण केरळचे आहे. बाबू जॉर्ज वलावी यांनी ४३ वर्षांपूर्वी ३,५०० शेअर्स खरेदी केले होते. त्या नंतर ते विसरले. आज या शेअर्सचे मूल्य १४४८ कोटी रुपयांवर गेले आहे.



    शेअर्स खरेदी करणारे बाबू जॉर्ज वलावी आज ७३ वर्षांचे आहेत. त्यांनी दावा केला आहे की, “१९७८ मध्ये मेवाड ऑइल आणि जनरल मिल्स लिमिटेडचे ​​३,५०० शेअर्स खरेदी केले होते. ही कंपनी राजस्थानच्या उदयपूरची आहे. तेव्हा ती एक सूचीबद्ध नसलेली कंपनी होती.”

    शेअर्स खरेदी केल्यानंतर बाबू हे कंपनीत २.८ टक्के भागधारक बनले. ते म्हणाले, “कंपनीचे संस्थापक अध्यक्ष पी.पी. सिंघल आणि मी त्यावेळी मित्र होतो. शेअर्स खरेदी करताना कंपनी सुचिबद्ध यादीत नसल्याने कोणताही लाभांश देत नव्हती. त्यामुळे मी आणि माझे कुटुंब या गुंतवणुकीला विसरलो.

    पण जेव्हा २०१५ मध्ये कंपनीत आपण गुंतवणूक केल्याचे आठवले आणि तपास सुरू केला. तेव्हा असे आढळले की, कंपनीचे नाव आता बदलून पीआय इंडस्ट्रीज केले असून ती एक सूचीबद्ध कंपनी बनली आहे. यानंतर बाबूंनी कंपनीवर बनावट कागदपत्रांचा वापर करून आपल्या मालकीचे शेअर्स १९८९ मध्ये बेकायदा विकल्याचा आरोप केला.

    शेअर खरेदी केल्याचे मूळ प्रमाणपत्रे घरी सुरक्षित असताना माझे शेअर्स मला न कळविता कंपनीने कसे काय विकले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अधिक तपासात स्पष्ट झाले की, त्यांचे शेअर्स उदयपूर येथील १३ जणांना विकण्यात आले आहेत.

    दरम्यान, कंपनीने बाबू यांच्या दाव्यांचीही चौकशी केली. त्यानंतर २०१६ मध्ये पीआय इंडस्ट्रीजने बाबू यांना दिल्लीला बोलावले. पण बाबू यांनी नकार दिला. त्यांची कागदपत्रे तपासण्यासाठी कंपनीने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना केरळमध्येही पाठवले होते. कंपनीने कबूल केले की बाबू यांच्याकडे असलेली कागदपत्रे खरी आहेत. यानंतरही कंपनीने त्यांना रक्कम दिलेली नाही. तसेच कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

    सहा वर्षांपूर्वी सेबीकडे तक्रार ; उत्तर नाही

    याबाबत सहा वर्षांपूर्वी सेबीकडे त्यांनी तक्रार दिली होती ते म्हणाले, “जर गुंतवणुकदाराचा शेवटचा आधार सेबी मानली जाते. पण, जर वेळेवर कार्य करत नसेल, तर काय फायदा आहे? यामुळे अनेक गुंतवणुकदारांना चुकीचा संदेश जाईल की सेबी आणि भारत सरकार या प्रकरणात योग्यरित्या वागत नाहीत. मला न्याय मिळाला पाहिजे. न्यायाला विलंब होता कामा नये.” सेबीने या प्रकरणाकडे काळजीपूर्वक पाहिले पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे, अशी त्यांची इच्छा आहे.

    Man Bought 3,500 Shares 43 Years Ago & Forgot About It, Now Its Value Is Rs 1448 Crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य