• Download App
    ऐन कोरोनातही जाहीर सभांचा सपाटा लावणाऱ्या ममतांच्या मनसुब्यांवर पाणी; निवडणूक आयोगाच्या बंदीमुळे रद्द !।Mamta cancelled poll railles after Election commissions directions

    ऐन कोरोनातही जाहीर सभांचा सपाटा लावणाऱ्या ममतांच्या मनसुब्यांवर पाणी; निवडणूक आयोगाच्या बंदीमुळे रद्द !

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता : प. बंगलच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आज निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे अखेर तीन जाहीर सभा रद्द कराव्या लागल्या आहेत. वाढत्या कोरोनामुळे निवडणूक आयोगाने मोठ्या जाहीर प्रचारसभा घेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ममतादिदींची अखर पंचाईत झाली असून त्यांच्या प्रचाराच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. Mamta cancelled poll railles after Election commissions directions



    राज्यात कोरोना वाढल्याने जाहीर सभा घेणार नाही असे दोन दिवसांआधी ममतादीदींनी मोठ्या तारस्वरात सांगितले होते. मात्र आपलाच शब्द फरवत त्यांनी काल तीन जाहीर सभा घेतल्या होत्या. त्याला मोठी गर्दीही झाली हती. त्यामुळे त्यांच्या कथनी व करनीतील फरक स्पष्ट जाणवला होता. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सर्व सभा रद्द करण्याची घोषणा कालच केली होती.

    ही आयती संधी मानत दीदी मात्र आपल्या साऱ्या सभा घेणार होत्या. कोरोनाच्या नावाखाली भाजपच्या सभांवर टीका करायची आणि स्वतः मात्र सभा घ्यायचा असा त्यांचा मनसुबा होता. त्यामुळे काल रात्री त्यानी सभांचा कार्यक्रम जाहीरही केला होता. मात्र निवडणूक आयोगानेच आता जाहीर सभांवर बंदी घातल्याने मोठ्या सभा रद्द करण्याशिवाय दीदींपुढे पर्याय राहलेला नाही.

    राज्यात आता शेवटच्या टप्प्याचे मतदान बाकी असून दोन मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

    Mamta cancelled poll railles after Election commissions directions

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!