प्रतिनिधी
कोलकाता : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालिन सनातन धर्माला मलेरिया, डेंगी आणि कोरोना समजून त्याचे निर्मूलन केले पाहिजे, असे असल्याचे बेलगाम उद्गार काढले. त्यावरून देशभर संत प्रचंड संताप उसळला असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र अत्यंत बोटचेपी भूमिका घेतली आहे. mamta banerjee say about udaynidhi stalin Sanatana Dharma should be eradicated
उदयनिधी स्टालिन यांच्या ‘सनातन धर्माचे निर्मूलन झाले पाहिजे’ या वक्तव्यावर ममता बॅनर्जी यांनी अत्यंत सौम्य शब्दांत नाराजी प्रकट केली आहे. यासंदर्भातल्या व्हिडिओ त्यांच्या तृणमूळ काँग्रेसने जारी केला आहे.
ममता त्यामध्ये म्हणतात :
मला तमिळनाडूच्या लोकांबद्दल खूप आदर आहे… पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की, प्रत्येक धर्माच्या त्यांच्या स्वतंत्र भावना आहेत. ..भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, लोकशाही देश आहे आणि त्याच बरोबर विविधतेत एकता हेच आपले मूळ आहे. म्हणूनच सनातन धर्माचा मी आदर करते…आपण मंदिर, मशीद, चर्च सर्वत्र जातो. आपण या पैकी कोणावरही टीका करता कामा नये. समाजातल्या कोणत्याही मोठ्या घटकाला आपण दुखावू नये. त्यामुळे उदयनिधी यांच्या वक्तव्यावर वक्तव्याची मी “निंदा” करण्याऐवजी, माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, मोठ्या वर्गाला किंवा लहान वर्गाला दुखावल्या जाणार्या कोणत्याही गोष्टीवर आपण भाष्य करू नये. विविधतेतील एकता आपण लक्षात ठेवली पाहिजे.
एकीकडे उदयनिधी यांच्या सनातन धर्मावरील अश्लाघ्य टीकेवरून देशभर संताप उसळला असताना दुसरीकडे “इंडिया” आघाडीतल्या ममता बॅनर्जी यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने सोशल मीडियात त्यांच्यावरही संताप व्यक्त होत आहे.
mamta banerjee say about udaynidhi stalin Sanatana Dharma should be eradicated
महत्वाच्या बातम्या
- भारताची संरक्षण निर्यात 6 वर्षांत 10 पटींनी वाढली, 80 देशांना 16 हजार कोटींची शस्त्र विक्री
- PM मोदी म्हणाले- देशात पूर्वी एक अब्ज उपाशी होते, आता दोन अब्ज कुशल हात; 2047 पर्यंत भारत विकसित देश होणार
- मध्यावधी नाहीच, निवडणूकही लांबणीवर टाकणार नाही; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेटाळले विरोधकांचे दावे
- Maratha Reservation :”…म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही” भाजपाने साधला निशाणा!