विशेष प्रतिनिधी
कोलकता : प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपला आक्रमक पवित्रा दाखविण्यास सुरूवात केली आहे. वीरेंद यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून बदली करत निवडणूक आयोगाने त्यांच्याऐवजी पी. नीरजनारायण यांची नियुक्ती केली होती. बॅनर्जी यांनी वीरेंद्र यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नेमणूक केली आहे. Mammtadidi did police officers transfers
निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर काही पोलिस व इतर अधिकाऱ्यांची बदली केली होती. बॅनर्जी यांनी त्यांना पुन्हा पूर्वीच्या पदावर नेमण्यास सुरुवात केली आहे.
त्याचप्रमाणे, जावेद शमिन यांचीही पुन्हा अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक काळात बदली होणारे शमिन हे पहिले आयपीएस अधिकारी ठरले होते.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर पकड असल्याचे दाखविण्यासाठी ममता बॅनर्जींनी या दोघा आयपीएस अधिकाऱ्यांना आधीच्या पदावर नेमल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी एकूण २७ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
Mammtadidi did police officers transfers
महत्त्वाच्या बातम्या
- तृणमुलमधून आलेल्या कचऱ्यामुळे भाजपचा पराभव, तथागत रॉय यांचा प्रदेश नेतृत्वावर निशाणा
- मुले बाधित झाली तर पालकांनी काय करावे? लहानग्यांच्या लसीकरणावर विचार करा
- पश्चिम बंगालवर केंद्र सरकारची नजर कायम, हिंसाचाराच्या चौकशीसाठी बंगालमध्ये पथक
- केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून महसुली तुट अनुदानापोटी 17 राज्यांना 9,871 कोटी रुपये
- शहामृगासारखे संकट आल्यावर वाळूत तोंड खूपसून बसलात, उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना फटकारले