वृत्तसंस्था
कोलकता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. केंद्राने घाटल बृहत आराखडा प्रकल्पाला उशीर लावल्यानेच राज्यात पूरस्थिती ओढवली, अशी टीका त्यांनी केली. Mammata Banarjee targets Modi govt. for flood situation
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. मोयरापूकुरमध्ये हेलिकॉप्टरने आल्यानंतर त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. गेल्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे जलमय झाले. पुरात किमान २३ जणांचा मृत्यू झाला.
या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी दिल्लीला पथक पाठविण्याची घोषणाही त्यांनी केली. त्या म्हणाल्या, की हा पूर मानवनिर्मित आहे. केंद्र घाटल बृहत आराखड्याच्या अंमलबजावणीच्या आमच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत आहे. वारंवार विनंती करूनही केंद्र बधीर झाले आहे. मी पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून याबाबत अहवाल तयार करेन. घाटल बृहत आराखड्याप्रमाणे या परिसरातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी तसेच कालव्यांच्या दुरुस्तीसाठी अनेक प्रकल्प हाती घेतले जातील.
Mammata Banarjee targets Modi govt. for flood situation
महत्त्वाच्या बातम्या
- सैफ-करीना तिसऱ्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवणार, मुघलांची आयपीएल टीम तयार करत आहेत, नेटकऱ्यां चा दुसऱ्या मुलाच्या नावावरून निशाणा
- राज्यसभेतील दांडीबहाद्दर भाजपा खासदारांची पंतप्रधान घेणार झाडाझडती
- पेगासिस प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले, वादविवाद केवळ न्यायालयातच व्हायला हवा, सोशल मीडियावर नाही
- पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना, भाजपा कार्यकर्त्याच्य ३४ वर्षीय पत्नीवर घरात घुसून सहा जणांकडून सामूहिक बलात्कार, तृणकूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कृत्य
- प्रीतम मुंडे, नवनीत राणांनी शिवसेनेला लोकसभेत धू धू धूतले, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर तुमचा कळवळा कोठे गेला होता?